Pune Jadutona Saam Tv
मुंबई/पुणे

Pune: फोडलेला नारळ, लिंबू, हदळ-कुंकू अन्...; घरासमोर जादूटोण्याचा प्रकार; घटनेचा सीसीटीव्ही VIDEO व्हायरल

Pune Black Magic News: पुण्यातील कडुस गावात भरदुपारी जादूटोण्याचा प्रकार घडला. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली. एक महिला आणि पुरूष बंद घरासमोर नारळ, लिंबू आणि हळद-कुंकू टाकून निघून गेले.

Priya More

Summary -

  • कडुस गावात बंद घरासमोर जादूटोण्याचा प्रयत्न

  • जादूटोण्याचा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

  • दही-भात, लिंबू, हळद-कुंकू ठेवून नारळ फोडल्याचा प्रकार

  • व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच गावकरी घाबरले

रोहिदास गाडगे, पुणे

पुणे जिल्ह्यातल्या खेड तालुक्यातील कडुस गावात भरदुपारी घडलेल्या एका जादूटोणाच्या प्रकारामुळे परिसरात प्रचंड खळबळ उडाली. जादुटोणा करतानाचा प्रकार सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला आहे. बंद घराच्या दारापुढे दही-भात, लिंबू, हळद- कुंकू लावून नारळ फोडून जादूटोणा केल्याचा प्रकार घडला. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या विचित्र कृत्यामुळे गावकऱ्यांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झालं असून हा प्रकार जमिनीच्या वादातून केल्याचा संशय व्यक्त केला जातोय.

सीसीटीव्ही व्हिडीओत दिसत आहे की, कडुस गावातील लोकवस्तीतील एका जुन्या बंद घरासमोर हातात पिशवी घेऊन आलेला एक पुरुष भरदुपारी काहीतरी विधी करताना स्पष्ट दिसत आहे. दारात दही–भात, लिंबू ठेवून त्यावर हळद–कुंकू लावलो आणि त्यानंतर नारळ फोडतो. इतकंच नव्हे तर या पुरुषासोबत एक चेहरा बांधलेली महिला सुद्धा दिसत आहे. परिसरातील नागरिकांनी जेव्हा त्याला विचारलं, तेव्हा त्यांनी मुंबईहून आलोय असं सांगितलं.

अचानक झालेल्या या प्रकारामुळे स्थानिकांमध्ये भीती आणि संतापाचं वातावरण आहे. गावकऱ्यांच्या मते या बंद घरासंबंधी मालमत्तेचा वाद सुरू असून त्यातूनच हा जादूटोणा करण्यात आल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. दरम्यान, या घटनेचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत असून गावात अंधश्रद्धा आणि जादुटोण्याची दहशत पसरली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT