Talathi and Student Found Dead in Pune Junnar Valley Saam Tv News
मुंबई/पुणे

Junnar Crime : तलाठी अन् 'ती' अल्पवयीन मुलगी एकमेकांचे नातेवाईक, जुन्नर प्रकरणी मोठा ट्विस्ट

Talathi and Student Found Dead in Pune Junnar Valley : दोघांमध्ये काही दिवसांपासून अनैतिक संबंध असल्याचीही माहिती समोर आली आहे. त्यामुळे या प्रकरणाला वेगळं वळण लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Prashant Patil

पुणे : पुणे : पुण्यातील जुन्नर जवळच्या १२०० फूट खोल दरीत दोन मृतदेह आढळल्यानंतर एकच खळबळ उडाली. दुर्गम आदिवासी भागात असलेल्या कोकणकडा परिसरात तरूणी आणि एका व्यक्तीचा मृतदेह आढळला असून, या घटनेची संपूर्ण चर्चा होतेय. प्राथमिक तपासात ही आत्महत्या असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. मृतांमध्ये एका सरकारी कर्मचाऱ्याचा आणि एका तरुणीचा समावेश आहे, ज्यामुळे या प्रकरणाला गंभीर स्वरूप प्राप्त झालं आहे. त्याचदरम्यान, पोलिसांच्या तपासात या प्रकरणामध्ये अनेक खुलासे होताना दिसत आहे. मयत तलाठी आणि महाविद्यालयीन तरुणी हे एकमेकांचे नातेवाईक असल्याची माहिती आता समोर आली आहे. असुन दोघांनी आरोप केले कुटुंबातील व्यक्ती नात्यातीलच असल्याने दोघांचे नक्की काय नातं होतं याबाबत वेगवेगळी चर्चा रंगलीय.

दोघांमध्ये काही दिवसांपासून अनैतिक संबंध असल्याचीही माहिती समोर आली आहे. त्यामुळे या प्रकरणाला वेगळं वळण लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दुहेरी आत्महत्येनंतर पोलिसांना सुसाईड नोट सापडल्या होत्या. त्यात तलाठ्याने आपल्या पत्नीवर गंभीर आरोप केले होते. तर तरुणीनेही आपल्या कुटुंबीयांबाबत खळबळजनक दावे केले होते. रामचंद्र पारधींनी सुसाइड नोटमध्ये आई-वडील आणि भावाची माफी मागितली. तर पत्नी आणि तिच्या नातेवाईकांनी मानसिक त्रास दिल्याचा आरोप करत कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

रामचंद्र पारधी यांची गाडी आणि त्यांच्या चपला कोकण कड्यावर आढळल्यानं ग्रामस्थांचा संशय बळावला. शिवजन्मभूमी रेस्क्यू टीमच्या १६ जणांनी खोल दरीतून मृतदेह बाहेर काढले. अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंदा येथील तलाठी रामचंद्र साहेबराव पारधी आणि जुन्नरच्या आंबोली येथील तरुणी या दोघांचे मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली होती. यापूर्वी १५ जून रोजी तरुणीच्या अपहरणाची तक्रार नातेवाइकांनी जुन्नर पोलीस स्टेशनमध्ये नोंदवली होती. प्रथमदर्शनी ही आत्महत्या असल्याचा अंदाज असला, तरी जुन्नर पोलिसांकडून सर्व बाजूने तपास सुरु आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bhiwandi Accident: देवदर्शनावरून घरी परतताना काळाचा घाला; मुंबई-नाशिक महामार्गावर दुचाकीचा अपघात, बापलेकीचा मृत्यू

Leopard Attack: मैत्रीला जागला...! बिबट्याचा कुत्र्यावर हल्ला, श्वानाच्या निडर मैत्रीसमोर बिबट्याची माघार Video Viral

IPS Anjana Krishna: आधी वाद नंतर अजितदादांची स्पष्टीकरणाची पोस्ट; उपमुख्यमंत्र्यांनाच पॉवर दाखवणारी अंजली कृष्णा नेमक्या कोण?

Vanraj Andekar Case: तोच महिना अन् आंदेकर टोळीने नाना पेठेतच आयुषचा गेम केला, पुण्यात रक्तरंजित थरार

HIV: एचआयव्हीच्या रुग्णांनी कोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत?

SCROLL FOR NEXT