Pune Crime Saam Tv
मुंबई/पुणे

Pune Crime : पुण्यात भयंकर घडलं! दिवसाढवळ्या सोन्याच्या दुकानावर दरोडा, कोयत्याने सपासप वार केले अन्...

Pune News : पुण्यातील वडगाव बुद्रुक परिसरातील गजानन ज्वेलर्स या दुकानावर दरोडा पडला. दरोडेखोरांनी दुकानाच्या कोयत्याने वार करत दागिन्यांचे दुकान लुटले. या हल्ल्यात दुकानाच्या मालकासह एकजण गंभीर जखमी झाला आहे.

Yash Shirke

Pune : पुण्यामधून धक्कादायक बातमी समोर आली आहे. सिंहगड रस्ता परिसरातील वडगाव बुद्रुक येथील गजानन ज्वेलर्स नावाच्या दागिन्यांच्या दुकानावर चार अज्ञात दरोडेखोरांनी भरदिवसा दरोडा घातला. आरोपींनी कोयत्याने हल्ला चढून लाखोंच्या ऐवजावर डल्ला मारला. या घटनेमुळे वडगाव बुद्रुक परिसरामध्ये मोठी खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी (१ जुलै) सकाळी सुमारे ११ च्या सुमारास ही घटना घडली. दरोडेखोर थेट दागिन्यांच्या दुकानात घुसले. त्यांनी धारदार शस्त्रांनी दुकानातील लोकांवर सपासप वार केले. त्यानंतर सोन्या-चांदीचे दागिने, रोख रक्कम आणि अन्य मौल्यवान वस्तू मिळवून दरोडेखोर घटनास्थळावरुन फरार झाले.

पुणे शहराच्या सुरक्षेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी घटना सिंहगड रस्ता परिसरात घडली. वडगाव बुद्रुक येथील ‘गजानन ज्वेलर्स’ या दागिन्यांच्या दुकानावर चार अज्ञात दरोडेखोरांनी भरदिवसा कोयत्यांनी हल्ला चढवून लाखोंच्या ऐवजावर डल्ला मारला. या हल्ल्यात दुकानमालक व एक कर्मचारी गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

दरोड्याची माहिती मिळताच सिंहगड रस्ता पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या प्रकरणी पोलिसांकडून तपास सुरु आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींचा शोध घेतला जात आहे. दिवसाढवळ्या मुख्य रस्त्यावर असणाऱ्या दुकानावर दरोडा पडणे आणि पोलिसांना याची उशिरा माहिती मिळणे ही बाब अत्यंत गंभीर मानली जात आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी २० पक्षांनी आखली रणनीती; इंडीया आघाडीचा आयोगावर धडक मोर्चा

IND vs WI 2nd ODI: गिल-रोहितचा तडाखा; वेस्ट इंडिजचा 405 धावांचा डोंगर भुईसपाट, टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय

दुष्काळात सुट्टी घेणं अधिकाऱ्यांना महागात पडणार; थेट होणार फौजदारी कारवाई

SCROLL FOR NEXT