PUNE ACCIDENT saam tv
मुंबई/पुणे

दोन चिमुकल्यांचं छत्र हरपलं! शिवाई बसची दुचाकीला धडक, आई-वडिलांचा जागीच मृत्यू

Pune Jejuri Morgaon Road Accident Latest News: पुणे जिल्ह्यातील जेजुरी-मोरगाव मार्गावर शिवाई एसटी बस आणि दुचाकीची समोरासमोर धडक झाली. या भीषण अपघातात महेंद्र आणि रेश्मा नाझीरकर या पती-पत्नीचा जागीच मृत्यू झाला.

Omkar Sonawane

सचिन जाधव, साम टीव्ही

पुणे जिल्ह्यातील जेजूरी-मोरगाव मार्गावर शिवाई एसटी बस आणि दुचाकीची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला. या अपघातात दुचाकीवरील पती-पत्नीचा जागीच मृत्यू झाला. कैलास पेट्रोल पंपाजवळ काल सकाळी ही दुर्घटना घडली. महेंद्र पोपट नाझीरकर (वय 35) आणि रेश्मा महेंद्र नाझीरकर (वय 30, रा. नाझरे-कडेपठार) अशी मृत पती पत्नीची नावे आहेत. महेंद्र नाझीरकर हे पत्नी रेश्मा यांच्यासह दुचाकीवरून नाझरे गावातून जेजूरीच्या दिशेने जात होते. याचवेळी पुण्याहून बारामतीकडे जाणाऱ्या शिवाई एसटी बसची त्यांच्या दुचकीला समोरासमोर धडक बसली. या भीषण धडकेत दोघांचाही जागीच मृत्यू झाला.

अपघातानंतर दोघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी जेजुरी ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले. या प्रकरणी जेजुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

दरम्यान, महेंद्र आणि रेश्मा हे शेतकरी कुटुंबातील होते. शेतीला जोडधंदा म्हणून ते जेजुरी येथे भाजीपाल्याचा छोटेखानी व्यवसाय करत होते. त्यांच्या पश्चात दोन लहान मुले आहेत. आई-वडिलांच्या अचानक झालेल्या मृत्यूमुळे या चिमुकल्यांच्या संगोपनाचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

अपघातानंतर ट्रक घाटात पलटी

मुंबई -आग्रा महामार्गवरील नाशिकच्या चांदवड येथे राहुड घाटात आज पहाटेच्या सुमारास टोमॅटो घेऊन जाणा-या ट्रक चालकाचे नियंत्रण सुटून त्याने समोरील कारला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात ट्रक घाटात पलटी झाला. ट्रकमध्ये टोमॅटो भरलेले होते. हे सर्व टोमॅटो ट्रकमधून खाली पडून मोठे नुकसान झाले आहे. अपघाताची माहिती मिळताच रुग्णवाहिका घटनास्थळी पोहचत अपघातात जखमी झालेल्यांना चांदवडच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Accident: महामार्गावर अपघाताचा थरार! प्रवाशांनी खचाखच भरलेली बस ट्रकला धडकली, १३ जणांचा मृत्यू

Maharashtra News Live Update: नाशिकमधील राहुड घाटात ट्रक- कारचा भीषण अपघात, २ जण गंभीर जखमी

Self Medication: भारतात 61 टक्क्यांहून अधिक लोक डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय घेतात औषधं; तरुणांमध्ये प्रमाण सर्वाधिक, रिसर्चमधून धक्कादायक माहिती समोर

Maharashtra Politics: सुनेत्रा पवारांची मोठी खेळी, भाजप अन् शिंदेसेनेला झटका; १०० पदाधिकाऱ्यांनी हाती घेतलं घड्याळ

Ramayana Collection : २०व्या दिवशीही 'रामायण'चा बॉक्स ऑफिसवर जलवा! कमाईत मोठी झेप; 'धुरंधर' अन् 'पुष्पा २'लाही टाकलं मागे

SCROLL FOR NEXT