Pune Jambhulwadi Dari Bridge Accident Saam TV
मुंबई/पुणे

Pune Accident: पुण्यातील जांभुळवाडी दरी पुलावर भयानक अपघात; कंटेनरने ४ ते ५ वाहनांना उडवलं, दोघांचा जागीच मृत्यू

Pune Jambhulwadi Dari Bridge Accident: पुण्यातील जांभूळवाडी येथील दरी पुलावर शनिवारी पहाटे ३ वाजेच्या सुमारास मोठा अपघात झाला आहे.

Satish Daud

सचिन जाधव, साम टीव्ही

Pune Jambhulwadi Dari Bridge Accident

राज्यात दिवाळीचा सण आनंदात साजरा केला जात असताना पुणे शहरातून भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. पुण्यातील जांभूळवाडी येथील दरी पुलावर शनिवारी पहाटे ३ वाजेच्या सुमारास मोठा अपघात झाला आहे. भरधाव वेगात असलेल्या कंटेनरने ४ ते ५ वाहनांना धडक दिली आहे. या अपघातात दोघांचा मृत्यू झाला आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

याशिवाय तीन ते चार जण जखमी झाल्याची प्राथामिक माहिती आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांसह (Police) अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. वाहनांमध्ये अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यात आलं. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

पुणे-बंगळुरू मार्गावर कात्रज येथील नव्या बोगद्याच्या आधी जांभूळवाडी येथे दरी पूल आहे. या ठिकाणी तीव्र वळण असल्याने सातत्याने अपघाताच्या (Accident) घटना घडत आहेत. शनिवारी पहाटे ३ वाजेच्या सुमारास साताऱ्याच्या बाजूने येणाऱ्या एका भरधाव कंटेनरने मुंबईच्या दिशेने येणाऱ्या ४ ते ५ वाहनांना पाठीमागून जोरदार धडक दिली.

ही धडक इतकी भीषण होती, की चारही वाहनांचा चक्काचूर झाला. अपघातानंतर कंटेनर भररस्त्यात उलटला. या भीषण अपघातात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला. तर ३ ते ४ जण गंभीर जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांसह अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली.

वाहनांमध्ये अडकून पडलेल्या प्रवाशांना बाहेर काढून उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. याप्रकरणी पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. ऐन दिवाळीत कंटेनर अपघातात दोघांचा जीव गेल्याने परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे. या भीषण अपघाताचा व्हिडीओ देखील समोर आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ragda Pattice Recipe : संडे स्पेशल चटपटीत स्नॅक्स, स्ट्रीट स्टाइल रगडा पॅटीस 'असे' बनवा घरी

BCCI Awards : रोहित शर्मा, विराट कोहली नव्हे, शुभमन गिल ठरला सर्वात मोठ्या पुरस्काराचा मानकरी; BCCI ची घोषणा

Maharashtra Live News Update : यवतमाळच्या मनपुर वर्तुळात वनपालाचा होरपळून मृत्यू

तीन वेळा आमदार राहिलेल्या भाजपच्या ज्येष्ठ नेत्याने दिला राजीनामा; पक्षाला मोठं खिंडार

Lucky Signs on Feet Soles: हाताप्रमाणे पायावरही असते भाग्य रेषा; 'हे' चिन्ह असेल तर नशीबात आहे राजयोग

SCROLL FOR NEXT