Pune IT hub Company shut down  
मुंबई/पुणे

मोठी बातमी! पुण्यातील IT कंपनी रातोरात बंद, ७०० हून अधिक सॉफ्टवेअर इंजिनियर बेरोजगार, आयटी क्षेत्रात खळबळ

Pune IT company closure : पुण्यातील हिंजवडी फेज-२ मधील थिंक टेक्नॉलॉजी इंडिया कंपनी अचानक बंद झाल्याने ७०० हून अधिक सॉफ्टवेअर इंजिनियर्स बेरोजगार झाले आहेत. पगार थकवणे, चेक बाऊन्स होणे आणि सिक्युरिटी डिपॉझिट न परतवल्याच्या आरोपांमुळे खळबळ उडाली आहे.

Namdeo Kumbhar

Pune IT hub Company shut down : पुण्याचे आयटी हब असलेल्या हिंजवडी परिसरातून एक अत्यंत धक्कादायक आणि खळबळजनक बातमी समोर आली आहे. हिंजवडी फेज-२ मधील 'थिंक टेक्नॉलॉजी इंडिया' (Think Technology India) ही आयटी कंपनी अचानक रातोरात बंद झाली आहे. (Think Technology India company shutdown Pune)

'थिंक टेक्नॉलॉजी इंडिया' कंपनीने कोणतीही पूर्वकल्पना न देता थेट कार्यालयाला टाळे ठोकल्यामुळे, तब्बल ७०० हून अधिक सॉफ्टवेअर इंजिनियर्स आणि फ्रेशर्सवर अचानक बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली आहे.

पगार थकवला, चेक्सही झाले बाऊन्स!

मिळालेल्या माहितीनुसार, ही कंपनी गेल्या काही महिन्यांपासून कर्मचाऱ्यांचे पगार थकवत होती. आर्थिक विवंचनेत असलेल्या कर्मचाऱ्यांना कंपनीने जे Cheques दिले होते, ते देखील बँकेत बाऊन्स झाले आहेत. त्यामुळे आधीच हवालदिल झालेल्या कर्मचाऱ्यांची मोठी आर्थिक फसवणूक झाली आहे. पुण्यातील शेकडो इंजिनिअर एका रात्री बेरोजगार झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.

लॅपटॉपच्या नावाखाली घेतलेली 'सिक्युरिटी डिपॉझिट'ही लाटली

कंपनीच्या मनमानी कारभाराचा फटका शेकडो तरुणांना बसला आहे. नोकरीवर रुजू करून घेताना कंपनीने कर्मचाऱ्यांकडून लॅपटॉपच्या नावाखाली प्रत्येकी १५,००० रुपयांची सुरक्षा ठेव (Security Deposit) घेतली होती. ही रक्कमही परत न करता कंपनीने थेट गाशा गुंडाळल्याने कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. ऐन मंदीच्या काळात ७०० आयटी कर्मचाऱ्यांची नोकरी अचानक गेल्याने पुण्याच्या आयटी वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Anil Kapoor Daughter: अनिल कपूरच्या लेकीला मोठा धक्का; कोट्यवधींचे हिऱ्यांचे कानातले चोरीला, सिनेसृष्टीत खळबळ!

Maharashtra News Live Update: जिल्ह्यावरील पाणीटंचाईचे संकट गडद

Hardik pandya trade: आधी हार्दिकला घेतलं आता यशस्वीवर डाव खेळणार? MI-RR मध्ये मोठ्या ट्रेडची चर्चा

पवनराजे निबांळकर हत्या प्रकरणातील आरोपींची निर्दोष मुक्तता; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी उचललं महत्वाचं पाऊल, काय निर्णय घेतला?

पवनराजे निंबाळकर हत्याकांडाचा निकाल विरोधात लागला; ओमराजेंची पहिली प्रतिक्रिया, शिंदेंच्या शिवसेनेत जाणार की नाही केलं स्पष्ट

SCROLL FOR NEXT