Crime News Saam Tv
मुंबई/पुणे

पुण्यात संतापजनक प्रकार! इन्शुरन्स कंपनीच्या बॉसने मर्यादा ओलांडल्या; महिला कर्मचार्‍याचा वारंवार विनयभंग

Pune crime news : पुण्यातील एका नामांकित इन्शुरन्स कंपनीतील वरिष्ठ अधिकाऱ्यावर महिला कर्मचाऱ्याचा वारंवार विनयभंग केल्याचा आरोप झाला आहे. हिंजवडी पोलिसांनी आरोपीला अटक केली असून प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

Namdeo Kumbhar

गोपाल मोटगरे, पिंपरी चिंचवड प्रतिनिधी

Workplace Harassment : पुण्यातील एका नामांकित इन्शुरन्स कंपनीतील बॉसने ऑफिसमधील महिला कर्मचाऱ्याचा वारंवार विनयभंग केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. वारंवार विनयभंग करणाऱ्या आरोपी बॉसला हिंजवडी पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून पुढील तपास करण्यात येत आहे. मोहम्मद उर्फ जाफर सय्यद असे आरोपी बॉसचे नाव आहे.

हा संतापजनक प्रकार औंध येथील एका इन्शुरन्स कंपनीच्या ऑफिसमध्ये घडला आहे. त्या बॉसने आपल्या महिला कर्मचाऱ्यांचा वारंवार विनयभंग केल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला. या प्रकरणात पीडित महिला कर्मचाऱ्यांनी हिंजवडी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. त्यानंतर, आज हिंजवडी पोलिसांनी मोहम्मद उर्फ जाफर सय्यद याला बेड्या ठोकल्या आहेत.

मोहम्मद सय्यद हा आपल्या इन्शुरन्स कंपनीतील एका महिला कर्मचाऱ्यांच वारंवार विनयभंग करत होता. तसेच तिच्यासोबत फोनवर कामा व्यतिरिक्त बोलायचा. त्या महिलेला लोणावळा येथे जेवण करण्यासाठी घेऊन जायचा अन् विनयभंग करायचा, असा आरोप महिलेने आपल्या तक्रारीत केला आहे. या घटनेनंतर पुण्यात एकच खळबळ उडाली आहे.

पुण्यात विक्रीसाठी आणलेलं 10 किलो अफू जप्त

पिंपरी चिंचवड शहरातील हिंजवडी पोलिसांनी अंमली पदार्थांविरोधात मोठी कारवाई केली. राजस्थानमधून पुण्यात विक् साठी आणलेले जवळपास 10 किलो 300 ग्रॅम अफूची बोंड हिंजवडी पोलिसांनी सापळा रचून जप्त केली आहेत. सिगरेटमध्ये नशा करण्यासाठी अफूच्या बोंडाची तस्करी करण्यात येत असल्याची माहिती हिंजवडी पोलिसांनी प्राप्त झाली होती. त्या अनुषंगाने हिंजवडी पोलिसांनी मान गाव परिसरात सापळा रचून आरोपीला बेड्या ठोकल्या. त्या आरोपीकडून जवळपास 10 किलो 300 ग्रॅम अफूची बोंड जप्त केली. जप्त करण्यात आलेल्या अफूच्या बोंडाची किंमत अंदाजे दीड लाख रुपये इतकी आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नंदुरबार जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी पावसाची हजेरी

Fatty liver disease: मद्यपान न करताही लिव्हर होतंय खराब? फॅटी लिव्हरच्या या सुरुवातीच्या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका!

Pune : केतन अग्रवाल हत्या प्रकरणातील धक्कादायक अपडेट, लोहगड दुर्घटनेआधीचा रोमँटिक व्हिडिओ आला समोर

Ladki Bahin Yojana: जून संपायला अवघे ६ दिवस बाकी; लाडक्या बहिणींच्या खात्यात ₹१५०० कधी येणार? संभाव्य तारीख आली समोर

पावसाळ्यात निरोगी राहण्यासाठी काय खावे? आणि काय खाऊ नये? वाचा पूर्ण लिस्ट

SCROLL FOR NEXT