उच्चभ्रू सोसायटीतील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश; 2 एजंट अटकेत अश्विनी जाधव केदारी
मुंबई/पुणे

Pune: उच्चभ्रू सोसायटीतील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश; 2 एजंट अटकेत

अश्विनी जाधव केदारी साम टीव्ही पुणे

पुणे - पुण्यातील उच्चभ्रू सोसायटीतील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला आहे. बिबवेवाडी पोलिसांकडून दोन एजंटला अटक करण्यात आली आहे. हायप्रोफाईल रहिवासी इमारतीत चाललेल्या अनधिकृत धंद्यांमुळे एकच खळबळ उडाली आहे. बिबवेवाडी येथील उच्चभ्रु सोसायटीत सुरु असलेल्या सेक्स रॅकेटचा बिबवेवाडी पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. यावेळी दोन पीडित महिलांची सुटका करण्यात आली आहे. तर वेश्या व्यवसाय चालवणार्‍या दोघांना अटक करण्यात आली आहे.महेंद्र प्रजापती आणि पांडुरंग शिंदे अशी अटक करण्यात आलेल्या एजंटची नावे आहेत.

हे देखील पहा -

महिला नेत्याच्या घरी सेक्स रॅकेट

दुसरीकडे, काल मध्यप्रदेशातील Madhya Pradesh सिहोरमध्ये पोलिसांनी एक मोठे सेक्स रॅकेट पकडले गेले आहे. या शहरातील बसस्थानकाजवळील एका घरात अनेक दिवसांपासून सेक्स रॅकेट सुरू होते. कारवाई करत पोलिसांनी 4 मुली, 3 ग्राहक, एक चालक, एक ऑपरेटर आणि एक महिला व्यवस्थापक अशा 10 जणांना अटक केली आहे.

पोलिसांना बऱ्याच दिवसांपासून सेक्स रॅकेटची माहिती मिळत होती, त्यावरून पोलिसांनी रात्री उशिरा छापा टाकला आहे. अटक करण्यात आलेल्या मुली भोपाळ येथून येत होत्या.ज्या महिलेच्या घरी सेक्स रॅकेटचा पर्दाफाश झाला आहे, ती अनुपमा तिवारी स्वतःला महिला लीडर म्हणवायची. तिने फेसबुकवर अनेक व्हीआयपींचे फोटो शेअर करायचे.

एकदा तिने शिवसेनेकडून महापालिका निवडणूकही लढवली होती, ज्यात त्यांचा दारुण पराभव झाला होता. ती स्वत:ला समाजसेविका आणि नेता म्हणवून घेत असे. सध्या पोलीस कसून चौकशी करत असून यामध्ये मोठे खुलासे होण्याची शक्यता आहे.

Edited By - Shivani Tichkule

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: रूपाली चाकणकर यांच्याप्रती केलेली कौतुकाची पोस्ट अजित पवारांनी केली डिलीट

Sanjay Raut Press Conference : जागा वाटपावर संजय राऊतांची प्रतिक्रिया; सांगितले मविआच्या जागांचे सूत्र

Gold Silver Price: सोनं ७८००० वर पोहचलं; दिवाळीआधीच सोने-चांदीला झळाळी

Dustbin Scam : नवी मुंबई मनपामध्ये डस्टबिन घोटाळा; काम न करता जुने फोटो दाखवून लाखोंचा भ्रष्टाचार

Karmayogi Abasaheb: सोलापुरात ५४ वर्षे आमदार, लोकांसाठी झटला, सर्वसामान्य नेत्याची कथा मोठ्या पडद्यावर! चित्रपटाचा ट्रेलर लाँच

SCROLL FOR NEXT