Vaishnavi Hagawane Saam
मुंबई/पुणे

Vaishnavi Hagawane: वैष्णवी हगवणे प्रकरणात ५ जणांना बेड्या, कोण कोण गजाआड? सहाव्या आरोपीला अटक कधी?

Vaishnavi Hagawane Case: मुळशी तालुक्यात वैष्णवी हगवणे हिने गळफास घेत आयुष्य संपवलं. या घटनेची माहिती पोलिसांनी या प्रकरणात आतापर्यंत ५ जणांना अटक केली आहे. सहाव्या आरोपीला अटक नसून, फक्त गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Bhagyashree Kamble

वैष्णवी हगवणे हिने सासरच्यांकडून होणाऱ्या छळाला कंटाळून आत्महत्या केली. या घटनेनंतर राज्यभरातून तीव्र संताप व्यक्त होत असून, पोलीस तपासात रोज नवे धक्कादायक माहिती उघडकीस होत आहे.

आज पहाटे पोलिसांनी कारवाई करत सासरे राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणे यांना स्वारगेट परिसरातून अटक केली आहे. याआधी, सासू लता हगवणे, पती शशांक हगवणे आणि नणंद करिश्मा हगवणे यांना अटक झाली होती. परंतु राजेंद्र आणि सुशील हगवणे यांच्यावर गुन्हा दाखल होताच फरार झाले होते.

१६ मे रोजी हुंडा आणि सासरच्या लोकांकडून होणाऱ्या जाचाला कंटाळून वैष्णवी हगवणे हिने गळफास घेत आत्महत्या केली. यानंतर पोलिसांनी तपास करत सासू - लता हगवणे, पती - शंशाक हगवणे आणि नणंद करिश्मा हगवणे या तिघांना अटक केली. मात्र, गुन्हा दाखल होताच सासरे राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणे हे दोघे फरार झाले होते.

राजेंद्र हगवणे हे उपमुख्यमंत्री अजित पवार गटाचे मुळशी तालुक्याचे तालुकाध्यक्ष होते. या घटनेनंतर त्यांना तातडीने पक्षातून बडतर्फ करण्यात आलं. १७ मे पासून राजेंद्र आणि सुशील हगवणे दोघेही फरार होते. मात्र, ६ दिवसांनंतर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत दोन्ही आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. दोन्ही आरोपींना पोलिसांनी पहाटे स्वारगेटमधून बेड्या ठोकल्या.

आता सहाव्या आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्याला अटक कधी होणार? असा प्रश्न निर्माण झाला आहे. सहावा आरोपी निलेश चव्हाण असून, त्याच्या नावे आधीही गुन्हे दाखल करण्यात आले होते. निलेश चव्हाण हा करिश्मा हगवणे हिचा खास मित्र आहे. त्याचे हगवणे कुटुंबाशी घनिष्ठ संबंध असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, पोलिसांच्या तपासात आणखी कोणत्या गोष्टींचा उलगडा होणार? आणखी कोणती माहिती समोर येणार? याकडे सगळ्यांचे लक्ष आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी आज येलो अलर्ट जारी

Prataprao Jadhav : मुंबई गुजरातची राजधानी होती, शिंदे सेनेच्या प्रतापराव जाधवांचे वक्तव्य

Politics: 'छत्रपती संभाजी राजेंनी १६ भाषा शिकल्या, ते काय मु**'; शिंदे गटातील आमदाराची जीभ घसरली

Ashadhi Ekadashi: आज आषाढी-देवशयनी एकादशीला करा हे सोपे उपाय; जीवनातील समस्या होतील पटकन दूर

Monsoon Alert : पुण्याला रेड अलर्ट, घाटमाथ्यावर धो धो कोसळणार, पुढील ५ दिवस आषाढधारा, वाचा हवामानाचा अंदाज

SCROLL FOR NEXT