Affordable MHADA flats in Pune available under FCFS scheme starting at ₹18 lakh. 
मुंबई/पुणे

MHADA: पुण्यात स्वस्तात मस्त घरं! अवघ्या १८ लाखात फ्लॅट; म्हाडाच्या २९५ घरांची विक्री, जाणून घ्या नोंदणी प्रक्रिया

Pune MHADA : महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरणाने (म्हाडा) पुणे जिल्ह्यात प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य (FCFS) या तत्त्वावर २९५ परवडणारी घरे विक्रीसाठी ठेवली आहेत. याआधी म्हाडाने मुंबईच्या स्थावर मालमत्ता बाजारपेठेत ११८ सदनिकांच्या विक्रीसाठी अशाच प्रकारच्या योजनेची घोषणा केली होती.

Bharat Jadhav

  • MHADA कडून २९५ घरे विक्रीसाठी उपलब्ध आहेत.

  • ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया ४ मे २०२६ रोजी सकाळी ११ वाजता सुरू होणार आहे.

  • ही योजना प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य (FCFS) या तत्त्वावर आधारित आहे.

म्हाडा पुणे जिल्ह्यात प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य (FCFS) या तत्त्वावर २९५ परवडणारी घरे विक्री करणार आहे. म्हाडाच्या म्हणण्यानुसार दोन लॉटरी फेऱ्यांनंतरही न विकलेली घरं प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य (FCFS) योजनेअंतर्गत विकली जात आहेत. या विक्रीसाठीची ऑनलाइन नोंदणी म्हाडाचे पुणे गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास मंडळ हाताळले जाणार आहे. दरम्यान अगदी माफक दरामध्ये ही ही घरे मिळणार आहे. यासाठी कुठे आणि कशाप्रकार अर्ज करायचा ते जाणून घ्या.

ऑनलाइन अर्ज करण्याची तारीख

म्हाडाने जाहीर केले आहे की, नोंदणी प्रक्रिया ४ मे २०२६ रोजी सकाळी ११ वाजता म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळावर सुरू होईल.

website: https://bookmyhome.mhada.gov.in.

जाहिरात येथे क्लिक करा.

या २९५ फ्लॅट्सपैकी ११३ पुणे महानगरपालिका (पीएमसी) म्हाडा योजनेअंतर्गत आणि १८२ पिंपरी-चिंचवड विभाग म्हाडा योजनेअंतर्गत आहेत. म्हाडाच्या म्हणण्यानुसार या योजनेअंतर्गत पुणे आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिका हद्दीतील चिखली, ताथवडे, वाकड, लोहगाव, मुंडवा, येवलेवाडी, वाघोली, किवाळे, फुरसुंगी, दुदुळगाव, पिसोळी, बालेवाडी, हडपसर, पुनावळे आणि इतर विविध भागांमध्ये 1RK, 1BHK, आणि 2BHK फ्लॅट्स उपलब्ध आहेत.

दरम्यान, प्रकल्पांनुसार आकार, किंमत आणि सुविधांमध्ये विविधता असल्याने अर्जदारांना त्यांच्या गरजेनुसार योग्य पर्याय निवडण्याची मुभा असणार आहे. म्हाडा पुणे मंडळाकडून इच्छुक अर्जदारांना अर्ज करण्यापूर्वी अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध असलेली सविस्तर माहिती पुस्तिका पहावी, असं आवाहन केलं गेलं आहे.

या पुस्तिकेत योजनेबद्दल आणि अर्ज प्रक्रियेबद्दल सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले आहे. अर्जदारांनी त्याच वेबसाइटवरून आपली नोंदणी पूर्ण करणे आवश्यक आहे," असे म्हाडाने एका निवेदनात म्हटले आहे. दरम्यान अपार्टमेंट खरेदी करू इच्छिणाऱ्या अर्जदारांना अर्नेस्ट मनी डिपॉझिट (EMD) अगाऊ रक्कम भरावे लागेल. ही रक्कम 20,000 हजार निश्चित करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Accident : मोठी बातमी: मुंबईत भाजप आमदाराच्या कारचा भीषण अपघात, फ्री वे वर ३ वाहनांना धडक

Maharashtra News Live Update: रोहित पवारांचा दुष्काळी दौरा; ‘काजू-बदाम खाऊन तरी बुद्धी चालवा’, सरकारवर जोरदार टीका

मोठी बातमी! मिरजमध्ये सरकारी रुग्णालयाचा स्लॅब कोसळला; 6 जण ढिगाऱ्याखाली अडकले, 2 जणांचा मृत्यू

8th Pay Commission Update: 3.25 फिटमेंट फॅक्टरची मागणी चर्चेत; केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगाराबाबत मोठी अपडेट

Actress Death: चित्रपटसृष्टीला मोठा धक्का; ज्येष्ठ अभिनेत्री काळाच्या पडद्याआड, कॅन्सरशी झुंज ठरली अपयशी

SCROLL FOR NEXT