Pune Hit And Run Cctv Saam Tv
मुंबई/पुणे

Pune Accident : पुण्यात पुन्हा हिट अँड रनचा थरार! पायी जात होता तरुण, ओव्हरटेक करण्याच्या नादात कारने उडवलं, तरुणाचा...

Pune Hit And Run Case : पुण्यातील शिरूर गोलेगाव येथील कानिफनाथ मंदिर परिसरात भीषण अपघात झाला. पायी चालत जाणाऱ्या एका तरुणाला समोरुन येणाऱ्या कारने धडक मारली. धडकेत जखमी झालेल्या तरुणाचा मृत्यू झाला.

Yash Shirke

सागर आव्हाड, साम टीव्ही, प्रतिनिधी

Pune News : पुण्याच्या शिरूर येथील गोलेगाव रोडवरील कानिफनाथ मंदिर परिसरात भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. या अपघातात २२ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे. हा हिट अँड रनचा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये कैद झाला आहे. अपघातानंतर कारचा मालक घटनास्थळावरुन फरार झाल्याचे म्हटले जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, धनुष राम केवट (वयवर्ष २२) या तरुणाचा अपघातात मृत्यू झाला आहे. हा तरुण कंत्राटी कामगार होता. शिरूर-गोलेगाव रस्त्यावरुन पायी जात असताना त्याला एका चारचाकी गाडीने जोरदार धडक मारली. या धडकेत धनुष गंभीररित्या जखमी झाला. जखमी अवस्थेत त्याला जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले.

चारचाकी कारने धडक मारल्यानंतर धनुष रस्त्यावर गंभीर अवस्थेत पडला. अपघातानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण उपचार सुरु असतानाच त्याचा मृत्यू झाला. या दुर्घटनेनंतर शिरूर परिसरात शोककळा पसरली आहे. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून त्यांचा पुढील तपास सुरु असल्याचे म्हटले जात आहे.

ज्या वेळेस धनुष रस्त्यावरुन पायी चालत जात होता. तेव्हा समोरुन येणाऱ्या चारचाकी कारने ओव्हरटेक करण्याच्या नादात धनुषला धडक मारली. या धडकेत धनुष जखमी झाला. धनुषला रुग्णालयात नेण्याऐवजी कारचालकाने घटनास्थळावरुन पळून जाण्याचा निर्णय घेतला. ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. सीसीटीव्ही फुटेजवरुन पोलीस फरार चालकाचा शोध घेत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ManoJ Jarange Patil : आंदोलनाचा शेवट मला गोळ्या घालून होईल; मनोज जरांगेंचा खळबळजनक दावा, VIDEO

Walmik Karad : वाल्मीक कराडला मोठा धक्का! बीड कारागृहातला मुक्काम वाढला, कारण...

Bigg Boss 19: 'सलमान खान पैसे नाही तर करिअर खातो'; प्रणित मोरेच्या जुन्या जोकवर चिडला भाईजान, म्हणाला...

Manoj Jarange Patil Protest Live Updates : मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला उद्याही परवानगी

Maharashtra Live News Update: - बारामती निरा रस्त्यावर भीषण अपघात

SCROLL FOR NEXT