Pune Hinjewadi Crime News  Saam Tv News
मुंबई/पुणे

Pune Crime : लग्नाच्या आणाभाका देऊन शारीरिक संबंध, प्रेग्नेंट राहिल्यावर रबडीमधून गर्भपाताची गोळी; पुण्यात खळबळ

Pune Hinjewadi Crime News : आदर्श मेश्राम याने लग्नाचं आमिष दाखवून संबंधित तरुणीशी वेळोवेळी शारीरिक संबंध ठेवले. यामध्ये ती गर्भवती राहिल्यानंतर तिच्या संमतीशिवाय तिला नकळत आरोपी आदर्श मेश्राम याने रबडीमध्ये गर्भपाताची गोळी मिसळून ती खाऊ घातली.

Prashant Patil

गोपाल मोटघरे, साम टिव्ही

पुणे : पुण्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीचं प्रमाण वाढत चाललं आहे. शहरात जणू क्राइमची मालिकाच सुरु आहे. अशातच एक धक्कादायक घटना पुण्यातून समोर आली आहे. लग्नाचं आमिष दाखवून वेळोवेळी तरुणीशी शारीरिक संबंध प्रस्थापित केला. त्यानंतर तरुणी गर्भवती राहिल्यानंतर तिला नकळत रबडीमध्ये गर्भपाताची गोळी मिसळवून जबरदस्तीने गर्भपात केल्याचा धक्कादायक प्रकार हिंजवडी पोलीस स्टेशन हद्दीत घडला आहे.

आदर्श वाल्मीक मेश्राम असं आरोपीचं नाव असून एका २८ वर्षीय तरुणीने सोमवारी हिंजवडी पोलीस स्टेशनमध्ये आदर्श वाल्मीक मेश्राम विरोधात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आदर्श मेश्राम याने लग्नाचं आमिष दाखवून संबंधित तरुणीशी वेळोवेळी शारीरिक संबंध ठेवले. यामध्ये ती गर्भवती राहिल्यानंतर तिच्या संमतीशिवाय तिला नकळत आरोपी आदर्श मेश्राम याने रबडीमध्ये गर्भपाताची गोळी मिसळून ती खाऊ घातली. त्यामुळे तिचा गर्भपात झाला, त्यानंतर आरोपी आदर्श मेश्राम याने तिच्याशी लग्न करण्यास नकार दिला. आपली फसवणूक झाल्याचं लक्षात आल्यानंतर पीडितेनं हिंजवडी पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली आहे.

धर्मगुरू अन् नणंदेकडून ख्रिश्चन धर्मांतरासाठी दबाव

दरम्यान, पुण्यातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. ख्रिश्चन धर्म स्वीकारण्यासाठी विवाहितेवर तिच्या नणंदेसह एका धर्मगुरूकडून जबरदस्ती केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ख्रिश्चन धर्म स्वीकारत नसल्यामुळे नणंदेनं महिलेला मारहाण केली. तसेच धर्मगुरूंनी तिला धमकी दिली. याच त्रासाला कंटाळून अखेर महिलेनं पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली.

पोलिसांकडे दाखल केलेल्या तक्रारीनुसार, १९ वर्षीय पीडित महिलेच्या नणंदेनं विवाहितेवर ख्रिश्चन धर्म स्वीकारण्यासाठी दबाव टाकला होता. जेव्हा विवाहित महिलेनं नकार दिला, तेव्हा महिलेला मारहाण करण्यात आली होती. तसेच नणंदेनं शिवीगाळ केली. या प्रकरणात फ्रान्सिस नावाच्या व्यक्तीने विवाहितेला धर्मांतरासाठी दबाव टाकला होता. 'मी बाटलीतून आणलेले पाणी प्यायले नाहीस..धर्म स्वीकारला नाहीस तर तुझ्याविरुद्ध पोलिसात खोटी तक्रार दाखल केली जाईल', अशी धमकी धर्मगुरूंनी दिली होती. वारंवार धर्मांतरासाठी दबाव टाकण्यात येत होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Fort : कुछ तुफानी करते है! 'हा' किल्ला चढताना काळजाचा ठोका चुकतो, २,२५० फूट उंचीवरचा थरारक ट्रेक

Maharashtra News Live Update: साखरेच्या दरवाढीत २२ ते २५ हजार कोटींचा घोटाळा? राजू शेट्टींचा गंभीर आरोप

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाआधी खुशखबर, कोणत्याही क्षणी खात्यात हप्ता जमा होणार; सरकारने घेतला मोठा निर्णय

Swine flu symptoms: देशभरात वाढतोय स्वाईन फ्लूचा धोका; ही 4 लक्षणं दिसली तर लगेच व्हा सावध

September Picnic Spots : सप्टेंबरमध्ये फिरण्यासाठी 'ही' ५ ठिकाणं ठरतील बेस्ट, आजच प्लान करा ट्रिप

SCROLL FOR NEXT