Law Against Love Jihad In Maharashtra Saam Tv
मुंबई/पुणे

Love Jihad: श्रद्धा वालकर प्रकरणानंतर पुण्यातील जोडपं ट्रोल, काय आहे प्रकरण?

मुलगा मुस्लिम तर मुलगी हिंदू आहे. दोघांना एकमेकांशी लग्न करायचं आहे.

साम टिव्ही ब्युरो

पुणे : दिल्लीतील श्रद्धा वालकर हत्येची घटना घडल्यानंतर लव्ह जिहादचा मुद्दा पुन्हा उपस्थित झाला होता. हिंदू-मुस्लीम जोडप्यांच्या नात्यांवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. याच दृष्टीने सरकार लव्ह जिहाद प्रकरणावर कायदा आणण्याच्या तयारीत आहे. आता लव्ह जिहादच्या दृष्टीने महत्त्वाची एक घटना समोर आली आहे. (Pune News)

सध्या ट्विटरवर पुण्यातलं एक जोडपं सोशल मीडियावर ट्रोल होत आहे. हे जोडपं उच्चशिक्षित आहे. पुण्यातल्या एका प्रसिद्ध संस्थेमध्ये दोघेही कार्यरत आहेत. मुलगा मुस्लिम तर मुलगी हिंदू आहे. दोघांना एकमेकांशी लग्न करायचं आहे.  (Maharashtra News)

आपल्या लग्नात काहीही अडचण येऊ नये म्हणून दोघांनी आपल्या लग्नासाठी विशेष विवाह कायद्याअंतर्गत अर्जही केला आहे. मात्र अडचण खरी त्यांच्या अर्जामुळेच निर्माण झाली आहे. कारण या दोघांनी अर्जासाठी दिलेली खासगी माहिती आता व्हायरल केली जात आहे.

माहिती सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर दोघांना धमक्या येऊ लागल्या आहेत. दोघांचं लग्न होऊ नये यासाठी प्रयत्न देखील केले जात आहेत. मुस्लीम मुलगा हिंदू मुलीला आपल्या जाळ्यात ओढत असून मुलीला यातून बाहेर काढलं पाहिजे, अशी मागणी सोशल मीडियातून होत आहे.

दोघांच्या आयुष्यात ज्या काही घडामोडी घडत आहेत, त्यामुळे दोघांचीही डोकेदुखी वाढली आहे. कुटुंबीयांना देखील याचा ताण सहन करावा लागत आहे. मुलाने संपूर्ण घडामोडींवर सकाळशी बोलताना आपल्या भावना व्यक्त केल्या. मी प्रचंड टेन्शनमध्ये असून मला आता काय बोलावं हे देखील सूचत नाहीये, प्रतिक्रिया मुलाने दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

kalyan : मराठी-हिंदी वाद सुरू असतानाच शिवसेनेत शेकडो उत्तर भारतीयांचा प्रवेश

Haunted Island: जगातील सर्वात भयानक झपाटलेले बेट, आवाज, आत्म्यांचा त्रास! वाचा सविस्तर

Maharashtra Live News Update : कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ...

Viral Video : मुलीला शाळेत सोडताना अचानक आला पाऊस, चिमुकली भिजू नये यासाठी आईनं जे केलं ते पाहून कराल कौतुक; पाहा VIDEO

Mahakumbh Monalisa: करोडोंचे हिरे, आलिशान गाडी, महागडे कपडे महाकुंभाच्या मोनालिसाचा स्टेटस बघून व्हाल थक्क

SCROLL FOR NEXT