MULSHI LANDSLIDE: THREE HOUSES BURIED NEAR DHAVADI VILLAGE AS HEAVY RAINS TRIGGER RESCUE OPERATION Saam Tv
मुंबई/पुणे

Pune : पुण्यात निसर्गाचं तांडव! गावाजवळच दरड कोसळली, ३ घरे गाडली गेली; ढिगाऱ्याखाली किती लोक अडकले? पाहा सविस्तर

Pune News : पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यात धावडी गावाजवळ मुसळधार पावसामुळे मोठी दरड कोसळून तीन घरे मातीखाली गाडली गेली. प्रशासन, पोलीस आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून बचाव व शोधकार्य सुरू असून परिसरात रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.

Alisha Khedekar

  • पुण्यात पावसाचा कहर

  • मुळशी तालुक्यातील धावडी गावाजवळ सोमवारी मोठी दरड कोसळली

  • दुर्घटनेत तीन घरे मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडली गेल्याची प्राथमिक माहिती

  • घरांमध्ये किती लोक होते याची माहिती प्रशासनाकडून घेतली जात आहे.

  • पुणे, मुंबई आणि कोकण भागासाठी पुढील दोन दिवस रेड अलर्ट जारी

सचिन जाधव, पुणे

पुण्यातून मोठी बातमी समोर आली आहे. पुणे जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मुळशी तालुक्यातील धावडी गावाजवळ सोमवारी मोठी दरड कोसळल्याची घटना घडली. या दुर्घटनेत तीन घरे मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडली गेल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. घरांमध्ये किती लोक वास्तव्यास होते, याची माहिती प्रशासनाकडून घेतली जात असून बचाव आणि शोधकार्य युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे.

माहितीनुसार, सतत सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे डोंगराचा मोठा भाग अचानक खचला आणि त्याखाली तीन घरे गाडली गेली. घटनास्थळी मोठ्या प्रमाणावर माती आणि दगडांचा ढिगारा साचल्याने घरे पूर्णपणे दिसेनाशी झाली आहेत. दुर्घटनेची माहिती मिळताच महसूल, पोलीस आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाचे अधिकारी घटनास्थळी रवाना झाले असून मदतकार्य सुरू करण्यात आले आहे.

दरम्यान, हवामान विभागाने मुंबई, पुणे आणि कोकण किनारपट्टीसह घाटमाथ्याच्या भागांसाठी पुढील दोन दिवस रेड अलर्ट जारी केला आहे. पुणे जिल्ह्याच्या घाटमाथ्यावरील भागांमध्ये मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला असून पुणे शहरासाठी यलो अलर्ट घोषित करण्यात आला आहे. नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये, असे आवाहन हवामान विभागाने केले आहे.

पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी सांगितले की, जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे काही नागरिकांचा मृत्यू झाला असून अनेक ठिकाणी दरडी कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत. परिस्थितीवर प्रशासनाचे बारकाईने लक्ष असून सर्व यंत्रणा सतर्क ठेवण्यात आल्या आहेत. संभाव्य आपत्ती टाळण्यासाठी आवश्यक त्या तातडीच्या उपाययोजना करण्यात येत असून नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहनही त्यांनी केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Monsoon Waterfall: पावसाळ्यात फिरायला जायचयं? मग पुण्याजवळील 'या' निसर्गरम्य धबधब्यावर करा विकेंड प्लॅन

Maharashtra News Live Update: पालघरला मुसळधार पावसाचा तडाखा; झांजरोळीतील २०० नागरिकांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर

Saswad Forts : सासवडला जाताय? मग जवळचे 'हे' ऐतिहासिक किल्ले पाहायला विसरू नका

पावसाळ्यात साचलेल्या पाण्यातून चालताना काय काळजी घ्यावी? 5 महत्त्वाच्या टिप्स

Breath holding test: तुम्ही किती सेकंद श्वास रोखू शकता? जाणून घ्या तुमची फुफ्फुसं किती निरोगी आहेत

SCROLL FOR NEXT