Pune weather update today Saam TV News
मुंबई/पुणे

Pune Rain : पुण्याला पावसाने झोडपले, नाले तुंबले, रस्ते पाण्याखाली, एका मुलाचा मृत्यू|VIDEO

Pune weather update today : पुण्यात मुसळधार पावसामुळे रस्ते जलमय झाले. वारजे भागात विजेचा धक्का बसून १० वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला. शहराला ऑरेंज अलर्ट जारी.

Namdeo Kumbhar

Heavy pre-monsoon rain in Pune : मॉन्सून पूर्व पावसाने पुण्याला झोडपून काढलेय. दोन तासांच्या पावसाने पुण्याच्या रस्त्यावर पाणीच पाणी झालेय. नाले तुंबल्यामुळे रस्ते पाण्याखाली गेले होते. त्यात वाहतूककोंडीमुळे नागरिक त्रस्त होते. पुण्यामध्ये तीन दिवसांपासून पडणाऱ्या पावसामुळे पुणेकरांची चांगलीच धांदल उडत आहे. तर हवामान खात्याकडून आज आणि उद्या देखील पुणे शहरासह पुणे जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.

कोथरूड, वारजे, औंध, एनडीए, पीाषण, शिवाजीनगर, विश्रांतवाडी, येरवाडा, खराडी, हडपसर, कोरेगाव पार्क, मगरपट्टा, फुरसुंगी, कात्रज, धनकवडी, हांडेवाडी, नांदेड फाटा, सिंहगड रस्ता, खडकवासला या भागात मंगळवारी पावसाने वादळी वाऱ्यासह हजेरी लावली. विजांच्या कडकटासह पुण्यात पाऊस पडत होता. पावसाचा धुमाकूळ सुरू असतानाच पुण्यात एका चिमुकल्याचा मृत्यू झाला.

मुलाचा मृत्यू -

पुण्यात विजेचा धक्का लागून चिमुरड्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. मंगळवारी रात्री पुम्यातील वारजे परिसरात दहा वर्षांच्या मुलाचा करंट लागून मृत्यू झाला. कडाक्याचा पाऊस सुरू असतानाच ही दुर्दैवी घटन घडली. घरासमोर असलेल्या विजेच्या खांबाला स्पर्श झाल्याने १० वर्षीय मुलाला जोरदार शॉक बसला. हा शॉक इतका तीव्रतेचा होता की शॉक च्या झटक्यात त्याचा मृत्यू झाला. मृत मुलाचे नाव मयंक उर्फ दादु प्रदीप आडागळे (वय 10) असे आहे.

पुणेकरांची तारांबळ -

पुणे शहराला मुसळधार पावसाने झोडपलं. अचानक आलेल्या मुसळधार पावसाने पुणेकरांची तारांबळ उडाली. शहरातील अनेक भागांमध्ये रस्त्यांवर पाणीच पाणी साचलं होतं. पावसामुळे रात्री अनेक ठिकाणी बत्ती गुल झाली होती. तर १५ ठिकाणी झाड पडण्याच्या घटना घडल्या. पुणे शहरात काल तब्बल २ तास मुसळधार पाऊस झाला. पावसामुळे शहरातील सर्व मुख्य रस्त्यांवर वाहतूक कोंडी झाली होती.

शहरासह जिल्ह्यात कुठल्या भागात किती पावसाची नोंद

शिवाजीनगर रात्री साडेआठपर्यंत २३.६ मिमी

तर रात्री १० वाजेपर्यंत चिंचवड येथे ९३.५ मिमी

हडपसर ६७.५ मिमी

लवळे ३४.२ मिमी

वडगाव शेरी ५८.५

तळेगाव ४० मिमी

कोरेगाव पार्क येथे ९ मिमी पावसाची नोंद झाली

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs SL: श्रीलंकेविरूद्ध टीम इंडियामध्ये ३ बदलांची शक्यता; फायनलपूर्वी 'या' खेळाडूंना मिळणार संधी, पाहा कशी असेल प्लेईंग 11

Devoleena Bhattacharjee: गोपी बहूचे बेबी बंप फोटो व्हायरल; चाहत्यांना देणार पुन्हा गोड बातमी?

Sanjay Raut : PM केअर फंडाच्या मदतीने शेतकऱ्यांना कर्जमुक्त करा, ठाकरेंच्या खासदाराची मागणी | VIDEO

Tadoba Andhari Tiger Reserve : ताडोबातील वाघाचे दर्शन महागणार, 1 ऑक्टोबरपासून सफारी दरात वाढ; किती रुपये मोजावे लागणार?

Maharashtra Live News Update: बार्शी तालुक्यात एकाच दिवशी दोन शेतकऱ्यांची आत्महत्या

SCROLL FOR NEXT