Crime Saam tv
मुंबई/पुणे

Pune News : हडपसरमध्ये गोळीबार, मस्तीत मारलेली गोळी भावाला लागली

Hadapsar Youth Fires Gun : पुण्यातील हडपसरमध्ये गोळीबाराची घटना घडली. वाढदिवसाच्या मस्तीत तरुणाने हवेत गोळी फायर केली, पण गोळी त्याच्या मावस भावाला लागली. जखमीवर ससून रुग्णालयात उपचार सुरू असून, पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

Namdeo Kumbhar

अक्षय बडवे, पुणे प्रतिनिधी

Pune Crime News : पुण्यातील हडपसरमध्ये गोळीबाराची थरारक घटना घडली. एका मुलाने गुरुवारी रात्री मस्तीत पिस्तूलमधून गोळी फायर केली, ती गोळी थेट भावाला लागली. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली. हडपसर येथील मुंडवा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास केला जात आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, गोळी झाडणारा मुलाचे राजकीय पक्षासोबत संबंध आहेत.

मस्तीत पिस्तुल लोड करून हवेत गोळी फायर करत असताना त्या तरूणाच्या मावस भावाच्या खांद्यातून गोळी आरपार गेली. गावठी पिस्तुलातून हा गोळीबार झाल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी पुण्यातील मुंडवा पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. गुरूवारी रात्री ही घटना घडल्याचे समोर आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जखमी वैभव श्रावण गवळी (वय 20) हा त्याचा मावस भाऊ सुमित खवळे, बसवराज सुतार यांच्यासह गुरुवारी रात्री 08.15 वाजताच्या सुमारास दुचाकीवरून हडपसर मधील पांढरे मळा कॅनॉल येथे वाढदिवसाकरिता जात होता. यावेळी सुमित खवळे याने त्याचे जवळ अवैध्यरित्या बाळगलेल्या गावठी कट्ट्यामधून गोळी सुटून त्याचे समोर त्याचे गाडीवर असलेल्या वैभव गवळी याचा डाव्या खांद्यावर लावली आणि यात तो जखमी झाला.

सध्या त्याच्यावर ससून हॉस्पिटल येथे उपचार सुरू असून तो सुस्थितीत आहे. जखमी इसम वैभव गवळी व सुमित खवळे हे एकमेकांचे मावसभाऊ आहेत. सुमित खवळे आणि त्याने गुन्ह्यात वापरलेली दुचाकी व गावठी कट्टा जप्त केला आहे. पोलिस गुन्हा नोंद करून पुढील तपास करीत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'Saiyara' तू तो बदला नहीं है... या ट्रेंडींग गाण्याचा अर्थ काय?

Asia Cup 2025 schedule : भारत-पाकिस्तान भिडणार, तारीख ठरली! आशिया चषक स्पर्धेचं संपूर्ण वेळापत्रक

Bhaskargad : मित्रांसोबत नाशिकला गेलाय? 'भास्करगड'ची आवर्जून सफर करा

Maharashtra Live News Update: पोहण्यासाठी गेलेल्या 20 वर्षीच्या तरुणाचा तलावात बुडून मृत्यू,नागपूरमधील घटना

Gautam Gambhir : टीम इंडियाची अवस्था 'गंभीर'; जबाबदार कोण? आकडेवारी चिंता वाढवणारी

SCROLL FOR NEXT