पुण्यात उद्यानांचाच बळी देण्याचा घाट ?  saam tv
मुंबई/पुणे

पुण्यात क्रीडांगणाचा बळी देण्याचा घाट ?

कसे तयार होणार ऑलिम्पिकपटू?

अश्विनी जाधव-केदारी, साम टीव्ही, पुणे

एकीकडे ऑलिम्पिकमध्ये पदक मिळाल्याचा आनंद साजरा करत असताना दुसरीकडे पुण्यामध्ये मात्र उद्यानांचाच बळी देण्याचा घाट घातला जात आहे, पुण्यातील धनकवडी भागातील आंबेगाव पठार इथे एका प्रस्तावित क्रीडांगणात रामाचे शिल्प उभारण्यावरून नवा वाद निर्माण झाला आहे. पुणे महापालिकेच्या स्थायी समितीत तब्बल टन कोटी रुपये खर्च करून रामाची मूर्ती क्रीडांगणात लावण्याचा ठराव मंजूर करण्यात आला आहे. धनकवडीतील आंबेगाव पठार भागातील भाजपच्या नगरसेविका वर्षा तापकीर यांनी हा ठराव दिला आहे, स्थायी समितीने तातडीने हा ठराव मान्य केला आहे, मात्र क्रीडांगणात रामाचे शिल्प बसवणे कितपत योग्य आहे असा प्रश्न यानिमिताने उपस्थित होत आहे.

दरम्यान आपल्याकडे क्रीडासंस्कृती रुजावी, वाढावी याकरिता क्रीडांगणे तयार झाली पाहिजेत, आरक्षित क्रीडांगणावर खेळासाठीच्या अधिकाधिक सोयी सुविधा उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. त्यामुळे क्रीडांगणाचा वापर अन्य कशासाठीही होऊ नये असे मत सजग नागरिक मंचचे विवेक वेलणकर यांनी व्यक्त केले आहे, तसेच धार्मिक अस्मितेच्या प्रतिकांना महत्व देणे धोरणात्मक दृष्ट्या कितपत योग्य आहे असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे, दरम्यान नगरसेविका वर्षा तापकीर यांनी जो प्रस्ताव सादर केलाय त्यात शिल्पासाठी आरएसएस सह सर्व हिंदुत्ववादी संघटना आग्रही असल्याचे म्हटले आहे, त्यामुळे क्रीडांगणात धार्मिक अस्मितेच्या प्रतिकांना महत्व देणे महत्वाचे की मुलांसाठी खेळाच्या सुविधा निर्माण महत्वाचे हा सवाल उपथित होत आहे.

तसेच महापालिकेच्या धोरणानुसार क्रीडांगणावर असे पुतळे उभे करायला परवानगी नसताना देखील स्थायी समितीने हा ठराव कोणत्या आधारावर मान्य केला, त्याचबरोबर देवांचे पुतळे क्रीडांगणावर उभे करून त्याच्या सुरक्षेची जबाबदारी कोण घेणार ? एकीकडे शहरी गरीब योजना निधी अभावी बंद करण्याचा घाट घातला जात आहे, शहराला अजूनही तिसऱ्या लाटेचा धोका सांगण्यात आला आहे अशी परिस्थिती असताना देखील महापालिका शिल्पावर कोटी रुपयांचा खर्च का करत आहे असे प्रश्न निर्माण होत आहेत, सर्वाधिक महत्वाचे म्हणजे कोरोना काळात सर्वच लोकप्रतिनिधींनी आरोग्य व्यवस्था सक्षम करण्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे, क्रीडांगणाच्या आरक्षित जागा इतर कारणांसाठी वापरल्या जाणार असतील तर क्रिडांगणे नाहीशी होतील, आणि क्रीडांगणे नसतील तर ऑलिम्पिकपटू कसे तयार होणार असा सवाल ही विचारला जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे मंगरुळ दस्तगीर मार्गावर भीषण अपघात

IPL 2026 : तो कोणीही असो, चुकीला माफी नाहीच! RCB च्या स्टार खेळाडूसह हार्दिक पंड्यावरही मोठी कारवाई

3 IAS आणि 12 IPS अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या; कोणाची कुठे नियुक्ती? वाचा पूर्ण यादी

Tuesday Horoscope: नोकरीत नवीन संधी मिळेल, या 5 राशींना पैशाचे व्यवहार जपून करा; वाचा मंगळवारचे राशीभविष्य

विराट कोहलीवर बंदी घातली जाणार? मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यावेळी घडली मोठी चूक

SCROLL FOR NEXT