Pune Kasba Ganpati Temple Reopen News Saam Tv
मुंबई/पुणे

Kasba Ganpati : भाविकांसाठी आनंदवार्ता! पुण्यातील प्रसिद्ध मंदिर दर्शनासाठी खुले; वाचा सविस्तर

Pune Kasba Ganpati Temple Reopen News : पुण्याचे प्रसिद्ध ग्रामदैवत श्री कसबा गणपती मंदिर आजपासून भाविकांच्या दर्शनासाठी खुले झाले आहे. मूर्तीवरील शेंदूर कवच दुरुस्ती व काढण्याची ऐतिहासिक प्रक्रिया पुरातत्व विभागाच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण झाले आहे.

Alisha Khedekar

  • श्री कसबा गणपती मंदिर आज पासून भाविकांसाठी खुले

  • मूर्तीवरील शेंदूर कवच दुरुस्ती व काढण्याची ऐतिहासिक प्रक्रिया पूर्ण

  • मूळ मूर्ती १५ व्या शतकातील असल्याचा अंदाज

  • भाविकांना प्रथमच मूळ मनोहरी स्वरूपातील गणेशमूर्तीचे दर्शन लाभणार

सागर आव्हाड, पुणे

Kasba Ganpati Pune: नववर्षाच्या पूर्वसंध्येला पुणेकरांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. पुणेकरांचे प्रसिद्ध ग्रामदैवत श्री कसबा गणपती मंदिर आज पासून दर्शनासाठी खुले करण्यात आले आहे. १५ डिसेंबर रोजी श्री कसबा गणपती मंदिर देवस्थान ट्रस्टच्या वतीने मंदिरातील मुख्य दैवत श्री जयति गजानन कसबा गणपती मूर्तीच्या शेंदूर कवच दुरुस्ती करण्यासाठी सुरुवात झाली होती. यासाठी मंदिर बंद ठेवण्यात आले होते. मात्र, आता शेंदूर कवच दुरुस्तीचे काम पूर्ण झाले असून गणपती मंदिर भाविकांसाठी खुले करण्यात आले आहे.

शेंदूर कवच काढल्यावर आत अतिशय मनोहरी अशी मूळ स्वरूपातील मूर्ती समोर आली आहे. मूर्तीतज्ञ आणि पुरातत्व विभागाच्या माहितीप्रमाणे या मूळ मूर्तीचा कालावधी थेट १५ व्या शतकात असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मंदिराच्या आतापर्यंतच्या उपलब्ध असलेल्या इतिहासात अशी प्रक्रिया प्रथमच झाल्याची माहिती देवस्थानचे प्रमुख विश्वस्त आशा पूरक ठाकर यांनी दिली. मूर्तीतज्ञ आणि पुरातत्व विभागासह संबंधित विभागांकडून त्यासंबंधी सविस्तर अहवाल मिळाल्यावर त्यावर शिक्कामोर्तब होईल.

गेल्या काही दिवसांपासून ऐतिहासिक पुरातन स्वयंभू श्रींच्या मूर्तीवरील शेंदूर मिश्रित कवच गळून पडत होते. ग्रामदैवत श्री कसबा गणपती तमाम गणेशभक्तांचे नवसाला पावणारे आराध्यदैवत आहे. त्यामुळे भविष्यात कुठलाही दुर्धर प्रसंग उद्भवू नये, म्हणून शेंदूर कवच लवकरात लवकर काढणे अत्यंत आवश्यक झाले होते. याकरिता पुरातत्व विभागाच्या मार्गदर्शनाखाली शेंदूर कवच काढण्याची प्रक्रिया करण्यात आली.

शेंदूर कवच काढण्याकरीता विविध मूर्तीतज्ञ, धार्मिक क्षेत्रातील तज्ञ तसेच पुरातत्व खात्याकडूनही मार्गदर्शन घेण्यात आले होते. ही संपूर्ण प्रक्रिया विधिवत आणि शास्त्रोक्त पद्धतीने या क्षेत्रातील तज्ञ व्यक्तींच्या मार्गदर्शनाखाली सुरू झाली होती. शेंदूर कवच काढणे व त्याअनुषंगाने आवश्यक ती कामे ही सर्व प्रक्रिया साधारण दोन आठवड्यात पार पडली. आता यानिमित्ताने ऐतिहासिक मूळ मूर्तीचे दर्शन घेण्याचे भाग्य गणेशभक्तांना लाभणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पनवेल आणि नवी मुंबईच्या फार्म हाऊस वर पोलिसांची नजर

BEST Bus Accident : भावाचं लग्न आटोपून वर्षा घरी निघाली, पण वाटेतच काळाचा घाला; बेस्ट बसने चिरडल्याने नर्सचा मृत्यू

Jaggery-peanuts Benefits: हिवाळ्यात गुळ-शेंगदाणे खाल्ल्याने शरीराला मिळतात हे फायदे

Gold Price : सोनं प्रति तोळा ५८००० रूपयांनी वाढले, वाचा वर्षभरात गोल्ड रेट कसे बदलले

Suniel Shetty: सुशांतनंतर, कार्तिक आर्यनविरुद्ध बॉलिवूडचा काही अजेंडा आहे का? सुनील शेट्टीने दिला इशारा

SCROLL FOR NEXT