पुणे : पुण्यात वास्तव्यास असलेल्या एका तरुणीने सोशल मीडियावर ‘पाकिस्तान जिंदाबाद’च्या घोषणा देणारी पोस्ट शेअर केल्याने खळबळ उडाली आहे. सकल हिंदू समाजाने ही माहिती एक्स (X) या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर प्रसिद्ध करत या प्रकरणी कारवाईची मागणी केली. या पोस्टमुळे संतापाची लाट उसळली असून, कोंढवा पोलिस ठाण्यात तरुणीविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.
सकल हिंदू समाजाच्या मते, पुण्यात शिक्षण घेणारी ही तरुणी तिच्या इंस्टाग्राम हँडलवरून पाकिस्तानच्या समर्थनार्थ पोस्ट लिहित होती. तिने ‘पाकिस्तान जिंदाबाद’ अशा घोषणा लिहिल्याचा दावा करण्यात आला आहे. ही पोस्ट व्हायरल झाल्यानंतर तिने तिचे इंस्टाग्राम अकाउंट डिलीट केलं. मात्र, या प्रकरणाने सोशल मीडियावर तीव्र पडसाद उमटले असून, अनेकांनी यावर संताप व्यक्त केला आहे.
कोंढवा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विनायक पाटणकर यांनी सांगितले की, 'या प्रकरणाची गंभीर दखल घेण्यात आली आहे. तरुणीविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, तपासाला सुरुवात झाली आहे. सकल हिंदू समाजानेही या घटनेचा निषेध करत पोलिसांना तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे. या प्रकरणामुळे पुण्यातील सामाजिक वातावरण तणावपूर्ण बनले असून, पोलिसांनी नागरिकांना शांतता राखण्याचं आवाहन केलं आहे.
दरम्यान, भारताने राबवलेल्या ऑपरेशन सिंदूरनंतर चवताळलेल्या पाकिस्तानने सूडापोटी काल गुरुवारी रात्री भारतावर हवाई हल्ला केला होता. मात्र, भारतीय सैन्याने पाकिस्तानचा हवाई हल्ला परतवलाच पण पुन्हा पाकिस्तानमध्ये घुसून प्रमुख शहारांना लक्ष्य केलं. भारतीय हवाई दल आणि नौदलानं केलेल्या प्रतिहल्ल्यामुळे पाकिस्तानची पळता भुई थोडी झाली. तर भारतीय पायदळानेही सीमारेषेवर पाकिस्तानच्या गोळीबाराला चोख प्रत्युत्तर दिलं होतं. भारतीय वायदूलाने क्षेपणास्त्र आणि ड्रोन्सच्या साहाय्याने हल्ला करुन रात्रभर पाकिस्तानला अक्षरश: भाजून काढलं होतं. पाकिस्तानच्या इस्लामाबाद, लाहोर, क्वेटा या प्रमुख शहरांमध्ये अनेक ठिकाणी स्फोट झाल. त्यामुळे याठिकाणी प्रचंड घबराट पसरली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.