PUNE GAY DATING APP ROBBERY CASE | WARJE POLICE ARREST TWO INCLUDING MINOR Saam Tv
मुंबई/पुणे

Pune : गे डेटिंग ॲपवर तरुणाला ओळख करणं पडलं महागात; भेटायला बोलावलं अन् भयंकर घडलं

Pune Crime News : पुण्यात ‘गे डेटिंग अँड चॅट’ ॲपद्वारे तरुणांना जाळ्यात ओढून मारहाण आणि लूट करणाऱ्या टोळीचा वारजे माळवाडी पोलिसांनी पर्दाफाश केला. एका अल्पवयीन मुलासह दोघांना बेड्या

Akshay Badve

  • पुण्यात डेटिंग ॲपद्वारे तरुणांना लुटणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

  • आरोपींनी ऑनलाइन मैत्री करून भेटायला बोलावले आणि मारहाण केली

  • मोबाईल हिसकावून पैसे लुटले

  • एका अल्पवयीन मुलासह दोघांना वारजे पोलिसांनी ताब्यात घेतले

पुणे शहरात ‘गे डेटिंग अँड चॅट’ ॲपच्या माध्यमातून तरुणांना जाळ्यात ओढून त्यांना मारहाण करत लुटणाऱ्या टोळीचा वारजे माळवाडी पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या प्रकरणात एका अल्पवयीन मुलासह दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून, या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे. ऑनलाइन डेटिंग ॲपचा गैरवापर करून तरुणांना लक्ष्य केले जात असल्याचे समोर आल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुणाची आरोपींसोबत एका ‘गे डेटिंग अँड चॅट’ ॲपवर ओळख झाली होती. सुरुवातीला आरोपींनी तरुणाशी मैत्री केली आणि अनेक दिवस त्याच्याशी चॅटिंग केली. हळूहळू विश्वास संपादन करून त्यांनी संबंधित तरुणाला भेटण्यासाठी वारजे माळवाडी परिसरात बोलावले. प्रत्यक्ष भेट झाल्यानंतर आरोपींनी अचानक फिर्यादीला धमकावत बेदम मारहाण केली. त्यानंतर त्याचा मोबाईल फोन हिसकावून घेत जबरदस्तीने ऑनलाइन व्यवहार करून पैसे स्वतःच्या खात्यात हस्तांतरित करून घेतले. एवढ्यावरच न थांबता त्यांनी तरुणाच्या गळ्यातील चांदीची साखळीही हिसकावून घेतली आणि घटनास्थळावरून पसार झाले.

या घटनेनंतर घाबरलेल्या तरुणाने वारजे माळवाडी पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. तक्रार मिळाल्यानंतर पोलिसांनी तातडीने तपासाची सूत्रे हलवली. आरोपींच्या मोबाईल लोकेशन, कॉल डिटेल्स आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पोलिसांनी संशयितांचा माग काढण्यास सुरुवात केली.

अखेर पोलिसांनी सापळा रचून मुख्य आरोपीसह त्याच्या अल्पवयीन साथीदाराला ताब्यात घेतले. पोलिसांकडून आरोपींकडे आणखी अशा प्रकारच्या गुन्ह्यांची माहिती मिळते का, याचा तपास सुरू आहे. तसेच ऑनलाइन डेटिंग ॲप वापरताना अनोळखी व्यक्तींवर लगेच विश्वास ठेवू नये, कोणतीही संशयास्पद हालचाल दिसल्यास तातडीने पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी नागरिकांना केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Impact Player नको, एका गोलंदाजाला 5 ओव्हर, सचिन तेंडुलकरने IPL मध्ये सुचवले 3 मोठे बदल

बड्या पोलीस अधिकाऱ्याचा अपघाती मृत्यू; भरधाव दुचाकी महामार्गावर उभ्या कंटेनरमध्ये घुसली, वाहनांचा चक्काचूर

पाठीवरची चरबी होईल गायब! ब्रा फॅट कमी करण्यासाठी रोज ५ मिनिटांत करा 'हे' ५ सोपे व्यायाम!

Maharashtra News Live Update: शिर्डी नाशिक महामार्गावर भीषण अपघात..

Dal Makhani Recipe: ढाबास्टाईल डाल मखनी खायची इच्छा होते? मग ट्राय करा ही सोपी रेसिपी

SCROLL FOR NEXT