Vanraj Andhare Case Saam Tv
मुंबई/पुणे

Vanraj Andekar Case: पुण्यात पुन्हा गँगवॉर! बदला, राग आणि रक्तरंजित थरार! आंदेकर टोळीने ३ जणांची केली हत्या

Vanraj Andekar Case Update: वनराज आंदेकर हत्याप्रकरणाला आता वेगळेच वळण आले आहे. वनराज आंदेकरच्या हत्येतील मुख्य आरोपी असलेल्या आकाश म्हस्केच्या सख्ख्या भावाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे.

Siddhi Hande

वनराज आंदेकर हत्या प्रकरणात महत्त्वाची अपडेट

आरोपी आकाश म्हस्केच्या सख्ख्या भावाचा खून

आंदेकर टोळीकडून बदल्याची भावना

अक्षय बडवे, साम टीव्ही प्रतिनिधी

वनराज आंदेकर खून प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी आकाश म्हस्के याचा सख्खा भाऊ अक्षय म्हस्के यांचा खून करण्यात आला आहे. माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्या हत्येत आकाश म्हस्केची भूमिका महत्त्वाची होती. हत्येसाठी लागणारे पिस्तूल त्याने मध्य प्रदेशातून पुण्यात आणले होते. आकाश म्हस्के हा वनराज आंदेकर खून प्रकरणाचा मुख्य सूत्रधार सोमनाथ उर्फ सोमा गायकवाड याचा विश्वासू साथीदार मानला जातो. आंदेकर यांच्या हत्येचा कट रचण्यात, त्यांच्यावर पाळत ठेवण्यात गायकवाड व आकाश म्हस्के यांचा सहभाग होता. त्यानंतर आंदेकरांवर गोळीबार करून कोयत्याने वार करत त्यांची हत्या करण्यात आली होती. आंदेकर यांची हत्या प्रकरणी आकाश म्हस्के सध्या शिक्षा भोगत आहे.

आंदेकर टोळीकडून बदल्याची आग

याआधी नगरसेवक वनराज आंदेकर खून प्रकरणातील आरोपींच्या नातेवाईकांचा खून करण्यात आला आहे. असं मानलं जातं की आंदेकर टोळीकडून वनराज च्या खुनाचा बदला घेण्यासाठी हे केलं जात आहे.

गणेश काळे खून (१ नोव्हेंबर २०२५)

गणेश काळे हा माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्या खुनातील आरोपी समीर काळे याचा भाऊ आहे. याच समीर याने वनराजच्या खुनात वापरलेली पिस्तुले मध्य प्रदेशातून आणली होती. तर तो प्रत्यक्ष वनराज यांचा खून करताना होता. त्याने देखील वनराज यांच्यावर गोळ्या झाडल्या होत्या. अखेर १ नोव्हेंबर रोजी त्याचा भाऊ गणेश याचा खून केला.

आयुष कोमकर (५ सप्टेंबर, २०२५)

वनराज आंदेकर यांच्या हत्येचा बदला आंदेकर टोळीने वनराज आंदेकर यांच्या हत्येतील आरोपी गणेश कोमकर याच्या मुलाची तब्बल 9 गोळ्या झाडून घेतला. गणेश विसर्जनाच्या पूर्व संध्येला हा सगळा प्रकार नाना पेठेत घडला. १ सप्टेंबर २०२४ मध्ये वनराज ची हत्या करण्यात आली होती, तो बंडू आंदेकर चा मुलगा होता आणि त्याच्या हत्येचा बदला म्हणून वनराजचा मारेकरी आरोपी गणेश कोमकर याच्या 18 वर्षाचा मुलगा आयुष कोमकर ची हत्या करून पूर्ण केल्याची चर्चा पुण्याच्या गुन्हेगारी क्षेत्रात रंगली. कोमकर खून प्रकरणात बंडू आंदेकरसह १३ आराेपींविरोधात मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Satara : फलटणमध्ये ‘कोयता गँग’चा थरार, गाड्या फोडत भररस्त्यात तरुणांचा धुडगूस

Maharashtra News Live Update : पेट्रोल डिझेल पॅनिक होऊन खरेदी करु नका- देवेंद्र फडणवीस

राजगड ते ईर्शाळगड! सह्याद्रीच्या कुशीतील ६ सर्वात थरारक अन् नयनरम्य किल्ले; ट्रेकिंगसाठी आहेत बेस्ट

Toilet Cleaning Trick: फ्रिजमधील बर्फ टॉयलेटमध्ये टाका, ५ मिनिटांत होईल चमत्कार; व्हायरल ट्रिक तुम्हाला माहितेय?

Sandesh Recipe: घरच्या घरी झटपट बनवा स्वादिष्ट संदेश, वाचा सोपी रेसिपी

SCROLL FOR NEXT