Pune News Saam Tv
मुंबई/पुणे

Pune Ganpati Visarjan : पुण्यात गणपती विसर्जन मिरवणुकीदरम्यान तरुणाकडे सापडला कोयता; पोलिसांनी केली कारवाई

Pune : पुण्यातील विसर्जन मिरवणूक तब्बल ३२ तासांनंतरही सुरू असून पोलिसांना एका व्यक्तीकडे कोयता सापडल्याने भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. १९४८ पासून २०२५ पर्यंत विसर्जनाला लागलेल्या वेळांचा ऐतिहासिक आढावा घेण्यात आला असून यंदाही विक्रमी विलंब झाल्याचं दिसत आहे.

Alisha Khedekar

  • पुण्यात विसर्जन मिरवणूक 32 तास उलटूनही सुरूच

  • पोलिसांना मिरवणुकीत अज्ञात व्यक्तीकडे कोयता सापडला

  • 1948 पासून विसर्जनाला लागलेल्या वेळांचा ऐतिहासिक आढावा

  • मुंबईतही लालबागच्या राजाचे विसर्जन रखडले, नागरिकांमध्ये नाराजी

राज्यात गणेशोत्सव थाटामाटात पार पडला. पुण्यात 32 तास उलटूनही अद्यापही गणपती विसर्जन मिरवणूका सुरु आहेत. त्यामुळे पोलिसांच्या सुरक्षाव्यवस्थेवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. या विसर्जन मिरवणुकीत पोलिसांना एका अज्ञात व्यक्तीकडे कोयता सापडल्याची घटना घडली आहे. या घटनेने पुणे शहरातील मिरवणुकीदरम्यान भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील मानाच्या पाच गणपतींचे नियोजित वेळेत विसर्जन झाले. मात्र इतर काही गणेश मंडळांच्या विसर्जन मिरवणूक सुरु आहेत. या मिरवणुकीत कडेकोट पोलिसांचा बंदोबस्त असून पोलिसांनी नेमून दिलेल्या नियमांना पुणेकरांनी धाब्यावर बसवले आहे. धक्कदायक म्हणजे चालू मिरवणुकीत पोलिसांना गस्त घालत असताना एका अज्ञात व्यक्तीकडे कोयता सापडला आहे.

या व्यक्तीला फटाके फोडताना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मात्र मिरवणुकीत हा कोयता या व्यक्तीकडे कसा आला. हा कोयता ठेवण्यामागे नेमकं कारण काय हे सगळे प्रश्न अनुत्तरित आहेत. पोलीस या घटनेची सखोल चौकशी करत आहेत. दरम्यान पुण्या पाठोपाठ मुंबईत देखील २६ तास उलटूनही लालबागच्या राजाचे विसर्जन झालेले नाही. भरती आणि विसर्जनासाठी गुजरातवरून मागवलेल्या तराफ्यामुळे राजाच विसर्जन रखडलं आहे.

1948 पासून ते 2025 पर्यंत कुठल्या वर्षी मिरवणुकीला किती वेळ लागला.

वर्ष तास

  • 1948 6 तास 30 मी

  • 1949. 8 तास

  • 1952 9 तास 15 मी

  • 1953. 9 तास 30 मी

  • 1954. 11 तास

  • 1967. 17 तास 24 मी

  • 1978 21 तास 30 मी

  • 1989. 29 तास 25 मी

  • 2005 33 तास 20 मी

  • 2016 - 2019 28 तास 15 मी

  • 2020 - 2021 कोरोनामुळे मिरवणूक नाही.

  • 2022. 31 तास

  • 2024 30 तास 15 मी

  • 2025 अजून मिरवणूक सुरू

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: भरपावसात आदिवासी महिलांचा अवैध दारू विरुद्ध एल्गार

Silent Heart Attack: सायलेंट हार्ट अटॅक कसा ओळखायचा, लक्षणे कोणती?

Maharashtra Politics: ठाकरेंसाठी अस्तित्वाची लढाई? मुंबई महापालिका कोण जिंकणार?

Sharad Pawar : शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून राष्ट्रवादी आक्रमक; शरद पवारांच्या नेतृत्वात नाशकात मोर्चा निघणार, VIDEO

Lalbaugcha Raja : ३३ तासांनी लालबागच्या राजाचं अखेर विसर्जन, पाहा शेवटची झलक; VIDEO

SCROLL FOR NEXT