Pun Ganapti Festival 2023: Saamtv
मुंबई/पुणे

Sarathi Guide: गणपती मंडळांसह पार्किंग व्यवस्था पाहा एका क्लिकवर; पुणेकरांसाठी ‘सारथी’ गणेशोत्सव गाइडचे अनावरण

Ganeshotsav Festival Pune 2023: गणेश मंडळ, वाहनांच्या पार्किंगबाबतची माहिती आता एका क्लिकवर मिळण्यासाठी सारथी क्युआर कोड तयार करण्यात आले आहे.

Gangappa Pujari

सचिन जाधव, प्रतिनिधी

Pune Ganapati Festival 2023:

पुणे शहरात गणेशोत्सवाचा जल्लोष आणि उत्साह पाहायला मिळत आहे. शहरात गणेशोत्सव काळात होणारी वाहतूक कोडी लक्षात घेत वेगवेगळ्या ठिकाणी पार्किंगची सोय करण्यात आली आहे, तसेच वाहतूकीतही मोठे बदल करण्यात आले आहेत. याबाबतची माहिती आता नागरिकांना एका क्लिकवर मिळवता येणार आहे. यासाठी सारथी गाईड लिंकचे अनावरण करण्यात आले आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, वाहतूक शाखेकडून गणेशोत्सवात मध्यवर्ती भागामधील गणेश मंडळ, वाहनांच्या पार्किंगबाबतची माहिती आता एका क्लिकवर मिळण्यासाठी सारथी या क्युआर कोड तयार करण्यात आले आहे.

‘सारथी' गणेशोत्सव गाइड २०२३ (Sarathi Ganesh Utsav Guide) लिंक आणि क्यूआर कोडचे अनावरण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) आणि पोलिस आयुक्त रितेश कुमार यांच्या हस्ते करण्यात आले. या सारथीद्वारे मध्यवर्ती भागातील मुख्य गणेश मंडळे तसेच वाहनतळांची व्यवस्था पाहता येणार आहे. तसेच उत्सव काळातील बंद रस्ते, पर्यायी चालू रस्ते, वाहतुकीतील बदलही पाहता येणार आहेत.

उत्सवात अधिकाधिक नागरिकांना सहभागी होण्यासाठी या ‘सारथी’ गाईडची निर्मिती करण्यात आली असून ‘सारथी’ गणेशोत्सव गाइड लिंक व क्यूआर कोड शहरात सार्वजनिक ठिकाणी उपलब्ध होणार आहे.

मध्यवस्तीतील पाच शाळा आणि सात महाविद्यालयांचे मैदान सायंकाळी सहा ते दुसऱ्या दिवशी पहाटे चार वाजेपर्यंत उपलब्ध राहणार आहे. याशिवाय पार्किंगसाठी महापालिका, इतर खासगी वाहनतळ, नदीपात्रातील माहिती लोकेशननुसार पाहता येणार आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Andheri News : मुंबईत रेल्वे स्टेशन परिसरात पार्किंग माफियांची मुजोरी; रेल्वेच्या नियमांना हरताळ, नागरिकांची सर्रास लूट

कोचिंग क्लासची पिकनिक जीवघेणी ठरली, रायगडमध्ये समुद्रात अकोल्यातील शिक्षकासह विद्यार्थ्याचा बुडून मृत्यू

2026 मध्ये सोनं आणखी महागणार? महायुद्धानंतर शक्तिशाली नेता उदयास येणार?

Maharashtra Politics: शिवसेना भाजप संबंध तुटणार? ठाकरे- शिंदेंच्या युतीवर राणे आक्रमक

Sunday Horoscope : नातेवाईकांकडून लाभ मिळणार; 5 राशींच्या लोकांचे नशीब उजळणार, अफाट पैसा येणार

SCROLL FOR NEXT