Pune: उरुळी कांचनमध्ये चारचाकी गाडीची काच फोडून पन्नास हजार लंपास सागर आव्हाड
मुंबई/पुणे

Pune: उरुळी कांचनमध्ये चारचाकी गाडीची काच फोडून पन्नास हजार लंपास

पतसंस्थेच्या बाहेर लावलेल्या चारचाकी गाडीची काच फोडून पन्नास हजार रुपये अज्ञात चोरट्याने पळवून नेल्याची घटना आज सोमवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास घडली आहे.

सागर आव्हाड, सामटीव्ही, पुणे

सागर आव्हाड

पुणे : उरुळी कांचन Uruli Kanchan ग्रामपंचायत हद्दीतील डॉ. मानिभाई देसाई पतसंस्थेच्या बाहेर लावलेल्या चारचाकी गाडीची काच फोडून पन्नास हजार रुपये (50 Thousand) अज्ञात चोरट्याने पळवून नेल्याची घटना आज सोमवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास घडली आहे.

हे देखील पहा-

राजेंद्र खंडू तावरे (वय- 49, रा. बोरिऐंदी, ता. दौंड) असे काच फोडून पैसे चोरीला गेलेल्या व्यक्तीचे नाव आहे. राजेंद्र तावरे व त्यांचे मित्र नवनाथ थोरात हे बोरिऐंदी येथून उरुळी कांचन मध्ये चार चाकी गाडी Four Wheeler Car घेऊन आले होते. दिवाळी असल्याने कामगारांच्या पगारी करण्यासाठी आले होते. त्यांनी पुणे सोलापूर महामार्गाच्या Pune Solapur Highway बाजूला असलेल्या ICICI बँकेतून सकाळी पाऊने अकरा वाजण्याच्या सुमारास चेकद्वारे 1 लाख रुपये रोख रक्कम काढली.

पैसे काढल्यानंतर ते त्या ठिकाणावरून 50 हजार रुपये बदलण्यासाठी उरुळी कांचन ग्रामपंचायत हद्दीतील डॉ. मानिभाई पतसंस्था Credit Union या ठिकाणी गेले. आणि उरलेले पन्नास हजार रुपये त्यांनी आपल्या गाडीमध्ये ठेवले होते. ते पतसंस्थेतून नोटा बदलून गाडीजवळ आले आणि त्यांनी पाहिलं की, डाव्या बाजूच्या गाडीची काच फुटलेल्या अवस्थेत आहे. त्यांनी गाडीत ठेवलेली रक्कम आहे का हे पाहिलं तर ती दिसून आली नाही.

आजूबाजूला लोकांजवळ, नागरिकांना विचारपूस केली. मात्र कोणीही काही पाहिले नाही असे सांगितले यावरून कोणीतरी आपल्या गाडीतून रोख रक्कम पन्नास हजार रुपये चोरून नेल्याची त्यांना खात्री झाली. ही घटना समजताच लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे Loni Kalbhor Police Station Pune पोलिस उपनिरीक्षक सदाशिव गायकवाड त्या ठिकाणी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्याचे काम लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे .

Edited By-Sanika Gade

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: अजित पवारांच्या निवासस्थानी मोठा जल्लोष

Eknath Shinde News : हा विजय न भूतो न भविष्यति आहे, एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया | VIDEO

Naresh Mhaske: महायुतीचा हा एकतर्फी विजय आहे, नरेश म्हस्के यांनी दिली प्रतिक्रिया| Video

Health tips: दालचिनीचे पाणी प्यायल्यास होतील 'हे' जबरदस्त फायदे

Eknath Shinde: महायुतीच्या विजयानंतर एकनाथ शिंदे यांची पहिली प्रतिक्रिया; शिंदेंनी मानले मतदारांचे आभार

SCROLL FOR NEXT