Pune Crime News  Saam Tv News
मुंबई/पुणे

Pune Crime : पुण्यातील प्रसिद्ध रीलस्टारवर जीवघेणा हल्ला, तिघांकडून बेदम मारहाण; शहरात खळबळ

Pune Crime News : आकाश बनसोडे हा वाघोली परिसरातील बाईक रोड या ठिकाणी वास्तव्यास आहे. त्याचे उबाळे नगर येथे हिरो मोटार शोरूम समोर न्यू मेन्स वेअर कपड्यांचे दुकान आहे. गुरुवारी रात्री आकाश बनसोडे हा आपल्या दुकानात होता.

Prashant Patil

पुणे : पुण्यामधील वाघोलीतील रीलस्टार आकाश उर्फ आक्या बनसोडेवर धारदार शस्त्राने तिघांनी प्राण घातक हल्ला केला आहे. या हल्ल्यात आकाश बनसोडे हा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर सध्या एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हल्ला करणाऱ्या तिघांना वाघोली पोलीस आणि गुन्हे शाखेच्या युनिट ६ ने संयुक्त कारवाई करत अटक केली आहे.

आकाश बनसोडे हा वाघोली परिसरातील बाईक रोड या ठिकाणी वास्तव्यास आहे. त्याचे उबाळे नगर येथे हिरो मोटार शोरूम समोर न्यू मेन्स वेअर कपड्यांचे दुकान आहे. गुरुवारी रात्री आकाश बनसोडे हा आपल्या दुकानात होता. त्यावेळेस त्याच्या दुकानात तीन जण अचानक आले आणि शिवीगाळ करत 'थांब तुझा गेमच करतो', असं म्हणत त्याच्यावर धारदार शास्त्राने वार करण्यास सुरुवात केली. या तिघांनी आकाश बनसोडे च्या पाठीमागून डोक्यावर भुवई जवळ, ओठांजवळ, पायाच्या मांडीवर धारदार शस्त्राने वार केले यामध्ये आकाश बनसोडे याला जिवे मारण्याचा प्रयत्न झाला. आकाश बनसोडे याला ठार मारण्याच्या प्रयत्नाचा गुन्हा यानंतर दाखल करण्यात आला.

या प्रकरणी ज्ञानोबा जाधव (वय १८) यांनी फिर्याद दिली असून पोलिसांनी आपले घर, खराडी येथे राहणाऱ्या अनिकेत दीपक वानखेडे, प्रवीण गोविंद माने व एका अल्पवयीन तरुणाला अटक केली आहे. या प्रकरणाचा वाघोली पोलीस अधिक तपास करत आहेत

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

BMC Mayor Election: महापौरपदासाठी भाजपची मोठी खेळी; मुंबईत मनसे भाजपसोबत जाणार?

अजितदादांच्या अंत्यविधीवेळी बारामतीत धक्कादायक प्रकार; गर्दीत 25 लाखांचे सोन्याचे दागिने लंपास

अजितदादांच्या विमान अपघाताचं सत्य-असत्य; व्हायरल व्हिडिओमागचं सत्य काय?

'भाजपच्या भ्रष्टाचाराच्या फाईलमुळे अजितदादांचा घात'; विमान पडलं की पाडलं? संजय राऊतांना संशय

महापौरनिवडीआधीच राजीनामा सत्र, भाजपच्या 102 नगरसेवकांचे राजीनामे?

SCROLL FOR NEXT