PUNE FAKE GODMAN CASE: 14-YEAR-OLD GIRLPHYSICALLY EXPLOITED saam tv
मुंबई/पुणे

महाराष्ट्राला भोंदूगिरीचा विळखा, पुण्यात बाबाबुवा झाले उदंड, पुण्याचा खरात कोण?

Fake Godman’s Shocking Crime in Pune; पुरोगामी महाराष्ट्राला भोंदूगिरीचा विळखा पडलाय का, अशी परिस्थिती निर्माण झालीये. नाशिकनंतर आता पुण्यातून अंधश्रद्धेचा आणि विकृतीचा अत्यंत संतापजनक प्रकार उघडकीस आलाय. एका स्वयंघोषित भोंदू बाबानं अलौकिक आणि दैवी शक्ती असल्याचा बनाव करून एका 14 वर्षीय अल्पवयीन मुलीचं लैंगिक शोषण केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. या अल्पवयीन मुलीसोबत नेमकं काय घडलंय ते पाहूयात...

Rohit Kadam

मावळ तालुक्यातील एका गावातून अल्पवयीन मुलगी बेपत्ता झाल्यानंतर तिच्या कुटुंबीयांनी वडगाव मावळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांकडून मुलीचा शोध सुरू असतानाच ती पुण्यातील बिबवेवाडी परिसरात एका तथाकथित भोंदू बाबाच्या मठात आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. 10 वीला चांगले मार्क मिळवून देतो, असं सांगून भोंदूनं 14 वर्षीय अल्पवयीन मुलीचं लैंगिक शोषण केलंय.

याप्रकरणी भोंदूबाबा स्वप्नील लांडेविरोधात गुन्हा दाखल केला असून सध्या तो फरार असल्याची माहिती आहे. महत्त्वाचं म्हणजे, या घटनेनंतर पीडित मुलीचे समुपदेशन करण्यात आलंय. या घडलेल्या प्रकरणाबाबत पीडितेच्या वकिलांनी काय म्हटलंय ते पाहूयात...

आरोपी लांडेनं अशाच पद्धतीने धर्माचा आणि चमत्कारांचा धाक दाखवून आणखी कोणाची आर्थिक फसवणूक किंवा लैंगिक शोषण केले आहे का, याचा शोध पोलिसांकडून सुरूये. खरंतर, ही एकच घटना नाहीये तर पुण्यातच आणखीन एका भोंदू बाबाचा व्हिडिओ व्हायरल झालाय. भक्त पाय धुवून पाणी पितानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. त्यामुळे पुण्यात भोंदूबाबांनी चांगलाच उच्छाद मांडल्याचं दिसतंय. कितीही कडक कारवाई झाली तरी बाबांची भोंदूगिरी काही थांबत नाही. त्यामुळे नागरिकांनीही अशा बाबांपासून सावधगिरी बाळगण्याची गरज आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: जंगल मेडो’ रिसॉर्टचे संचालक कुणाल जयंत पटेल यांची आत्महत्या

T20 Mumbai League: T20 मुंबई लीगमध्ये नवव्या टीमची भर; नवी मुंबईच्या खेळाडूंना आता मिळणार मोठी संधी

Banana Benefits: केळी खाल्ल्याने वजन वाढते की कमी होते? जाणून घ्या

Ritu Tawade : मुंबईच्या महापौर रितू तावडेंना दणका, सत्र न्यायालयाने ठोठवला दंड

Gold Rate Today: सोन्याच्या दरात मोठी घसरण, 10 तोळा 15,200 रुपयांची स्वस्त; 18K- 22K आणि 24K चे दर किती?

SCROLL FOR NEXT