सागर आव्हाड, साम टीव्ही
पुण्यातील बिबवेवाडी परिसरात एका खंडणी मागणाऱ्या तरूणाला पोलिसांनी अटक केली आहे. एका व्यावसायिकाला १० लाख रूपयांची खंडणी मागणाऱ्या तरूणाला पोलिसांनी अटक केली आहे. कुटुंबाला जिवे ठार मारण्याची धमकी देऊन ही खंडणी उकळण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. मात्र, पोलिसांना याची माहिती मिळताच त्यांनी हा कट उधळून लावा.
मोबाईलवरून धमकी देऊन खंडणीची मागणी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, व्यावसायिक गौरव प्रमोद दुगड यांना त्यांच्या ड्रायव्हरने धमकी दिली. अमित दत्तात्रय थोपटे असे आरोपीचे नाव आहे. थोपटे याने दुगड यांच्या वडिलांच्या मोबाईलमधून अश्लील मेसेज स्वत:च्या मोबाईवर पाठवले. तसेच याचे स्क्रिनशॉट काढून दुगड यांना पाठवले.
हे स्क्रिनशॉट व्हायरल करण्याची धमकी त्याने दिली. तसेच कुटुंबातील सदस्यांची जीवे मारण्याची धमकी दिली. धमकी दिल्यानंतर त्याने १० लाख रूपयांची खंडणीही मागितली. या प्रकरणाची तक्रार गौरव प्रमोद दुगड यांनी पोलीस ठाण्यात केली. पोलिसांना याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी चौकशीला सुरूवात केली.
तक्रार मिळताच बिबवेवाडी पोलिसांनी सापळा रचला. आरोपीने पुन्हा एकदा गौरव प्रमोद दुगड यांना फोन केला. तसेच खंडणीची मागणी केली आणि ठरवलेल्या ठिकाणी पैसे पाठवण्यास सांगितले. पोलिसांना याची माहिती मिळताच त्यांनी डमी व्यक्ती आणि चलनी नोटांची व्यवस्था करून आरोपीला पैसे जमा झाल्याचा खोटा मेसेज पाठवला. यानंतर आरोपी पैसे घेण्यासाठी ठरलेल्या ठिकाणी पोहोचला. तेव्हा पोलिसांच्या सापळ्यात तो अडकला आणि पोलिसांनी त्याला रंगेहाथ पकडलं.
उधारी फेडण्यासाठी खंडणी
आरोपीला अटक केल्यानंतर पोलिसांनी त्याची चौकशी केली. तेव्हा आरोपीने. मार्केटमध्ये उधारी झाल्याने आणि पैसे फेडण्यासाठी खंडणी मागितल्याची त्याने कबुली दिली. या प्रकरणात न्यायालयाने आरोपीला ३१ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.