Pune announces liquor sale ban during key Ganeshotsav days. 
मुंबई/पुणे

Pune Dry Day : पुण्यात 'या' ५ महत्त्वाच्या दिवशी दारू विक्री पूर्णपणे बंद, उत्पादन शुल्क विभागाचे आदेश

Pune Ganeshotsav 2026: पुण्यात गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर १४, २५, २६ सप्टेंबरसह ५ महत्त्वाच्या दिवशी मद्यविक्री बंद राहणार आहे. खडक, विश्रामबाग आणि फरासखाना परिसर १० दिवस ड्राय झोन असणार.

Akshay Badve

Pune Ganeshotsav 2026 dry days liquor ban dates : आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आणि उत्सव शांततेत पार पाडण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. गणेशोत्सवातील काही प्रमुख दिवशी तसेच विसर्जन मिरवणुकीच्या मार्गांवरील सर्व मद्य विक्रीची दुकाने बंद ठेवण्याचे कडक आदेश देण्यात आले आहेत. विशेष म्हणजे, मध्य पुण्यातील तीन पोलीस ठाण्यांच्या हद्दीत गणेशोत्सवाचे सर्व १० दिवस 'कोरडा क्षेत्र' (Dry Zone) म्हणून घोषित करण्यात आले आहेत.

गणेशोत्सवाच्या काळात पुण्यातील मध्यवर्ती भाग आणि विसर्जन मार्गांवर मोठ्या प्रमाणावर भाविकांची गर्दी होते. या काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रशासनाने 'ड्राय डे'च्या तारखा आणि नियम स्पष्ट केले आहेत. गणेशोत्सवादरम्यान संपूर्ण जिल्ह्यात ज्या ज्या ठिकाणी सार्वजनिक गणपती विसर्जन मिरवणुका निघतील, त्या त्या सर्व मिरवणूक मार्गांवरील मद्यविक्री अनुज्ञप्त्या बंद ठेवण्यात येतील.

'या' दिवशी पुण्यात मद्य विक्री पूर्णपणे बंद राहील:

१४ सप्टेंबर (श्री गणेश चतुर्थी): गणेश आगमनाच्या पहिल्या दिवशी शहरभरात मद्य विक्री बंद राहील.

२५ सप्टेंबर (अनंत चतुर्दशी): मुख्य विसर्जनाच्या दिवशी शहरभर पूर्ण वेळ 'ड्राय डे' असेल.

२६ सप्टेंबर: अनंत चतुर्दशीच्या दुसऱ्या दिवशी होणाऱ्या संपूर्ण विसर्जन मिरवणुकीची समाप्ती होईपर्यंत पुण्यातील मद्य विक्रीची सर्व दुकाने बंदच राहतील.

पाचवा आणि सातवा दिवस: गणेशोत्सवातील पाचव्या आणि सातव्या दिवशी शहरात होणाऱ्या ठराविक विसर्जन मार्गांवरील मद्य विक्रीची दुकाने बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

'या' ३ पोलीस ठाण्यांच्या हद्दीत १० दिवस कडक बंदी:

गणेशोत्सवाच्या संपूर्ण काळात पुणे शहरातील खडक, विश्रामबाग आणि फरासखाना या तीन पोलीस ठाण्यांची हद्द ड्राय डे (Dry Zone) म्हणून जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे या परिसरातील सर्व मद्य विक्रीची दुकाने गणेशोत्सवाचे सर्व दहा दिवस पूर्णपणे बंद राहतील. राज्य उत्पादन शुल्क विभागाने या आदेशाचे कडक पालन करण्याचे निर्देश दिले असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशाराही देण्यात आला आहे.

गणेशोत्सवादरम्यान सार्वजनिक शांतता, कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी महाराष्ट्र दारूबंदी कायदा १९४९ च्या कलम १४२ (१) नुसार मद्यविक्री बंद ठेवण्याचे (Dry Day) आदेश दिले आहेत. या आदेशानुसार एफएल-२, एफएल-३, सीएल-३, एफएलबीआर-२, फॉर्म ई, फॉर्म ई-२, टी.डी-१ या सर्व प्रकारच्या किरकोळ मद्यविक्री अनुज्ञप्त्या (दुकाने, बार आणि परमिट रूम) खालील दिवशी आणि भागांत बंद राहतील:

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Good News: आणखी एक वंदे भारत स्लीपर धावणार! २ महत्त्वाच्या शहरांना जोडणार; जाणून घ्या 'A टू Z' माहिती

Maharashtra News Live Update: खासदार ओमराजे निंबाळकर यांनी घेतली मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट

5 Best Kurti Sets for Women: महिलांसाठी स्टायलिश आणि ट्रेंडी कुर्ती सेट्स, लेटेस्ट 5 डिझाईन्स

October 2026 Bank Holidays : ऑक्टोबरमध्ये 12 दिवस बँका बंद; तुमच्या राज्यात किती दिवस बँका असणार बंद

Sachin Waze: मोठी बातमी! तब्बल साडेपाच वर्षांनी सचिन वाझे येणार तुरुंगाबाहेर; अँटिलिया स्फोटक प्रकरणी जामीन मंजूर

SCROLL FOR NEXT