Pune Drink And Drive Case saam tv
मुंबई/पुणे

Pune Drink And Drive : पुण्यात अपघाताचा थरार! मद्यधुंद चालकानं दुचाकीला दिली धडक, दुभाजकावर कार चढवली

Drink And Drive Case : पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिराजवळ ड्रंक अँड ड्राइव्हची घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. मद्यधुंद अवस्थेत एका कारचालकाने दुचाकीला धडक मारत वाहन दुभाजकावर चढवले.

Akshay Badve, Yash Shirke

  • पुण्यात बालगंधर्व रंगमंदिराजवळ ड्रिंक अँड ड्राइव्हची घटना

  • मद्यधुंद कारचालकाने दुचाकीस्वाराला दिली धडक आणि वाहन चढवले दुभाजकावर

  • डेक्कन पोलिसांकडून कार चालकावर ड्रिंक अ‍ॅड ड्राईव्हचा दाखल केला खटला

Pune Accident : पुण्यात ड्रिंक अँड ड्राइव्हची घटना घडली आहे. ही घटना पुण्याच्या बालगंधर्व रंगमंदिराजवळ घडली आहे. एका मद्यधुंद कारचालकाने दुचाकीस्वाराला धडक दिली आणि त्यानंतर वाहन थेट दुभाजकावर चढवले. दुभाजकाला धडक लागल्याने वाहनाचा अक्षरशः चेंदामेंदा झाला. परवाना नसताना चालक वाहन चालवत असल्याचे म्हटले जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिराच्या समोर हा अपघात घडला. धाराशिवच्या चालकाने वाहन परवाना नसताना दुचाकीला धडक मारली. त्यानंतर वाहन रस्त्याच्या दुभाजकावर चढवले. या प्रकरणी डेक्कन पोलिसांकडून कार चालकावर ड्रिंक अँड ड्राईव्हचा खटला दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

अनिकेत रमाकांत सोनटक्के (वय २५, चाकण, धाराशिव) असे या कारचालकाचे नाव आहे. ही घटना शनिवारी (४ ऑक्टोबर) संध्याकाळी ७ वाजता पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिर येथील विठ्ठल रामजी शिंदे पुलाजवळ घडली. शिक्षणासाठी पुण्यात आलेल्या सोनटक्केने सायंकाळी गर्दीच्या वेळी भरधाव वाहन चालवत दुचाकीस्वाराला धडक दिली आणि त्यानंतर वाहन पुढे छत्रपती शिवाजीनगर परिसरातील दुभाजकावर चढवले.

याबाबत डेक्कन पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या वाहन चालकाने आधी बालगंधर्व रंगमंदिरजवळ एका दुचाकीला धडक दिली, यात दुचाकीस्वार किरकोळ जखमी झाला. या तरुणाने माझी काही नुकसान झाले नाही, म्हणून तक्रार देण्यास नकार दिला आहे. काही अंतरावर असलेल्या एका दुभाजकावर वाहन चढवल्याने वाहनाचा मोठे नुकसान झाले. सोनटक्के याच्यावर डेक्कन पोलिस ठाण्यात ड्रिंक अँन्ड ड्राईव्हचा खटला भरण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gautami Patil: गौतमी पाटीलला अटक होणार? कार अपघातापूर्वीचा सीसीटीव्ही समोर

Ro-Ro Service: 200 प्रवासी आणि 75 वाहनं असलेली रो रो बोट अडकली; विरारच्या समुद्रातील थरार

Mumbai : मुंबईकरांसाठी खूशखबर! वाहतूक कोंडीतून सुटका होणार; महत्वाच्या महामार्गाबाबत घेतला मोठा निर्णय

Fire Incident : चालत्या कारला भीषण आग, सीएनजी गळतीमुळे भडका उडाला; चालकाचा होरपळून मृत्यू

Gold Coins Found: समुद्रात सापडला खजिना, सोनं, चांदीच्या नाण्यांचा पेटारा

SCROLL FOR NEXT