Pune DJ Protest saam tv
मुंबई/पुणे

DJ विरोधात पुणेकर रस्त्यावर, DJ वरून राजकारण तापलं

DJ Controversy Heats Up in Maharashtra: DJ विरोधात पुणेकर रस्त्यावर उतरलेले असतानाच आता या मुद्यावरुन राजकारणही चांगलचं तापलयं. नागपुरातील DJ बंदीच्या आदेशावरून राज ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांना सवाल केलाय. त्याला भाजपने काय प्रत्युत्तर दिलंय ? पाहूयात या रिपोर्टमधून...

Suprim Maskar

विद्यानंद बापटांनी पुण्यात डीजे बंदीवरून आक्रमक पवित्रा घेतलेला असतानाच आता पुणेकरही डीजे बंदीसाठी रस्त्यावर उतरलेत...'लाऊडस्पीकर विरोधी पुणेकर मंचा'च्या नेतृत्वाखाली पुणेकरांनी बालगंधर्व चौकात शांततेत मोर्चा काढला...नागपुरात कायद्याला मान, सोलापुरात परंपरेचे भान मग पुण्यातच लाऊडस्पीकरला का मोकळे रान? असा सवाल उपस्थित करत पुणेकरांनी डीजेविरोधात आक्रमक पवित्रा घेतला...

एकीकडे डीजेविरोधात पुणेकर रस्त्यावर एकवटलेले असतानाच राजकीय वातावरणही ढवळून निघालयं...नागपुरात डीजेबंदी शक्य आहे, मग महाराष्ट्रात डीजेबंदी शक्य का नाही? असा सवाल राज ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांना केलाय...तर डीजेचा वाद टोकाला गेल्यानं सरकारनं समन्वयानं तोडगा काढायला हवा, अशी मागणी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेंनी केलीय...

दुसरीकडे मुख्यमंत्र्यांनी डीजेसंदर्भात स्पष्ट निर्देश दिलेत... त्यामुळे राज ठाकरेंचं डीजेबंदीला समर्थन ही वराती मागून घोडं असा प्रकार असल्याची टीका मंत्री आशिष शेलारांनी केलीयं...

दरवर्षी सण-उत्सवांच्या वेळी ध्वनी प्रदुषणाचा मुद्दा चर्चेचा विषय ठरत असतो. यंदा मात्र विद्यानंद बापटांच्या निमित्ताने या मुद्याला जनआंदोलनाची धार आली आहे. त्यात विरोधकांची भूमिका पाहता कर्णकर्कश आवाजावर नियंत्रण येणार का? गणेशोत्सवाला अवघे काही दिवस उरलेले असताना अटीशर्थींच्या माध्यमातून तरी सरकार मोठ्या आवाजाला वेसण घालणार का ?हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे....

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Government Jobs : वन विभागात 30 हजार पदांची बंपर भरती! गणेश नाईकांची मोठी घोषणा

Maharashtra News Live Update: आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्याविरोधात २ हजार कोटींचा मानहानी दावा

दांडिया सुरू असताना कॉलेजमध्ये अनर्थ! लोखंडी सांगाडा कोसळून तरुणीचा मृत्यू, १७ विद्यार्थी जखमी, हादरवणारा व्हिडीओ

Nagpur Fort : विदर्भाची काशी! नदीच्या काठावर वसलाय ऐतिहासिक खजिना, सुट्टीत करा 'या' किल्ल्यावर भटकंती

Bigg Boss 20 : बिग बॉसमध्ये मोठा ट्विस्ट! अचानक बाजी पलटली, 'या' स्पर्धकाचा पत्ता कट

SCROLL FOR NEXT