Pune Daund Crime News Saam tv news
मुंबई/पुणे

Pune: पंढरीच्या वाटेवर लुटमार अन् अल्पवयीन मुलीचे लचके तोडले; पोलिसांनी २ आरोपींच्या मुसक्या आवळल्या

Pune Daund Crime News: वारीला जाणाऱ्या प्रवाशांच्या गळ्याला कोयता लावून आरोपींनी लुटलं. तसेच अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केला. या प्रकरणी पोलिसांनी तपास करत २ आरोपींच्या मुसक्या आवळल्या.

Bhagyashree Kamble

पुण्यातील दौंडमधून माणुसकीला काळिमा फासणारी घटना उघडकीस आली. वारीला जाणाऱ्या प्रवाशांच्या गळ्याला कोयता लावून आरोपींनी लुटलं होतं. तसेच एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केला होता. या प्रकरणी पोलिसांनी तपास करत दोन आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. पंढरपूरच्या वाटेवरच ही घटना घडल्यामुळे ग्रामस्थांसह वारकऱ्यांनी संताप व्यक्त केला.

नेमकं काय घडलं?

पुण्याच्या दौंड तालुक्यातून ३ ते ४ कुटुंब देवदर्शनासाठी निघाले होते. यादरम्यान, स्वामी चिंचोली परिसरात ७ भाविक चहासाठी वाहनातून खाली उतरले. नंतर त्या ठिकाणी २ अज्ञात व्यक्ती आले. त्यांनी भाविकांच्या गळ्याला कोयता लावून त्यांच्याकडील सोनं लुटलं. तसेच महागडे ऐवज लंपास केले. नंतर एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला. या प्रकरणी पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी गुन्हा नोंद करत तपासाला सुरूवात केली.

तसेच आर्टिस्टकडून आरोपीचे रेखाचित्र तयार करून घेतले. पोलिसांनी या रेखाचित्राच्या आधारे आरोपींच्या मुसक्या आवळल्या. अमीर पठाण आणि विकास सातपुते अशी दोघा आरोपींची नावे आहेत. गेल्या तीन दिवसांपासून पोलीस आरोपींच्या मागावर होते. मात्र, आरोपींचा थांगपत्ता लागत नव्हता. पण अखेर तपास करत पोलिसांनी दोन्ही आरोपींच्या मुसक्या आवळल्या.

पंढरपुरात जुनी इमारत कोसळली

पंढरपूर शहरातील प्रमुख स्टेशन रस्त्यावर असणारी बुरुड समाज ट्रस्टची जुनी इमारत आज दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास कोसळली आहे. यामध्ये रस्त्यावरील दोन भाविक किरकोळ जखमी झाले आहेत.

इमारत धोकादायक असूनही अंतर्गत वादामुळे कधी पाडली गेली नाही. दरम्यान, आज दुपारी इमारतीच्या छतापासूनचा काही भाग कोसळला. एका चहा विक्रेता करणाऱ्या हातगाड्यावर कोसळले असून, मंदिराकडे जाणाऱ्या प्रमुख स्टेशन रस्त्यावर ही घटना घडल्याची माहिती आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune News: पुण्यात फायनान्स कंपनीविरोधात शिंदेसेना आक्रमक, शेतकऱ्याच्या घराचं सील तोडलं

Train Accident: २ प्रवासी ट्रेनची एकमेकांना धडक, आतापर्यंत ४ प्रवाशांचा मृत्यू; ८८ जण गंभीर जखमी

Monday Horoscope: या राशींच्या आयुष्यात होणार मोठे बदल! कोणाला मिळणार पैशांचा लाभ? वाचा राशिभविष्य

Weight Loss Tips : वजन कमी करण्याचं सिक्रेट; 5 पदार्थ दररोजच्या आहारातून करा हद्दपार

Khan Saree Designs: महिलांसाठी खणाच्या साड्यांच्या लेटेस्ट डिझाईन्स, हे 5 पॅटर्न्स दिवाळीत दिसतील उठून

SCROLL FOR NEXT