pune news  Saam tv
मुंबई/पुणे

Pune News : दौंडमध्ये दोन गटात मोठा तणाव; गाड्या पेटवल्या, घराची तोडफोड, नेमकं कारण काय?

yavat two group clash : दौंडमधील यवतमध्ये दोन गटात तुफान राडा झाला. दोन गटात तणाव निर्माण झाल्यानंतर गाड्या पेटवण्यात आल्या. तसेच घराची तोडफोड देखील करण्यात आली.

मंगेश कचरे

पुणे : पुण्यातील दौंडच्या यवतमध्ये सोशल मीडियावरील एका आक्षेपार्ह पोस्टवरून दोन गटात मोठा राडा झाला. या घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झालं आहे. एका गटाने रस्त्यावर उतरून दुचाकी पेटवून दिल्या आहेत. तर यवतचा आठवडा बाजार देखील बंद करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील यवतमध्ये शुक्रवारी सकाळी एका गटाच्या व्यक्तीने सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट केली. त्यानंतर दुपारी बारानंतर यवतमध्ये दोन गट भिडले. या वादानंतर यवतमधील आठवडे बाजार बंद करण्यात आला. तर दुसरीकडे यवतमध्ये काही दुचाकी गाड्या पेटवून देण्यात आल्या आहेत. आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या व्यक्तीला यवत पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती यवतचे पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांनी दिली आहे.

या प्रकारामुळे यवत गावात तणावाचे वातावरण निर्माण झालं आहे. तणावाच्या पार्श्वभूमीवर यवत पोलिसांनी या भागात पोलीस बंदोबस्त वाढवला आहे. यवतमधील नीलकंठेश्वर मंदिरात शनिवारी 26 जुलै रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांची पुतळ्याची विटंबना केल्याची घटना घडली होती. त्यानंतर आज झालेल्या या प्रकारामुळे यवत परिसरात तणावाचे वातावरण आहे.

सोशल मीडियावर पोस्ट करणारा युवक यवत भागातील सहकार नगर भागात राहतो. स्थानिक कार्यकर्त्यांनी सहकार नगर भागात धाव घेत त्याच्या घराची तोडफोड देखील केली आहे. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने पुढील अनर्थ टळला आहे. या तणावामुळे यवत भागात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT