Pune Dam Water Storage Today 4 August 2023 panshet Lake 91 percent and varasgaon 82 percent Water Level latest marathi news  Saam TV
मुंबई/पुणे

Pune Dam Water Level: पानशेत धरण काठोकाठ भरलं; वरसगाव धरणाची स्थिती काय? पुणेकरांसाठी मोठी अपडेट

Pune Dam Water Level News Today: येत्या पंधरा दिवसांत होणाऱ्या पावसाच्या प्रमाणावर पानशेत आणि वरसगाव धरणातून पाणी सोडण्याबाबत विचार केला जाईल, अशी माहिती पाटबंधारे विभागाकडून देण्यात आली आहे.

Satish Daud

Pune Dam Water Level News Today: उशीरा का होईना पण यंदा राज्यात मान्सूनने जोरदार हजेरी लावली. जुलै महिन्यात राज्यातील अनेक भागात मुसळधार पाऊस झाला. पावसामुळे धरणांच्या पाणीपातळीत वाढ झाली असून तुर्तास पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे. पुणे जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसाने शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये मोठा पाणीसाठा जमा झाला आहे.

शहराला पाणीपुरवठा करणारे पानशेत धरण ९१ टक्के तर, वरसगाव ८२ टक्के भरले आहे. खडकवासला धरण भरल्यानंतर पानशेत व वरसगाव धरण परिसरात चांगला पाऊस पडला. कोकण घाटमाथ्यावर पावसात सातत्य राहिल्यास ही दोन्ही धरणे १५ ते २० दिवसांत पूर्ण भरतील, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

दरम्यान, येत्या पंधरा दिवसांत होणाऱ्या पावसाच्या प्रमाणावर पानशेत आणि वरसगाव धरणातून पाणी सोडण्याबाबत विचार केला जाईल, अशी माहिती पाटबंधारे विभागाकडून देण्यात आली आहे. पानशेत धरणात ९३ टक्क्यांपेक्षा जास्त पाणीसाठा झाल्यावर जलविद्युत केंद्र आणि नदीमधून पाणी सोडण्याबाबत विचार करण्यात येईल, असंही विभागाकडून सांगण्यात आलं आहे.

पुणे शहरातील पाणीकपात रद्द

दरम्यान, शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये मुबलक पाणीसाठा जमा झाल्याने पुणे शहरातील पाणीकपात रद्द करण्यात आली आहे. पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी याबाबतची घोषणा केली. मे महिन्यात पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमधील पाणीसाठा कमी होत असल्याने पाणीकपात लागू करण्यात आली होती.

पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमधील पाणीसाठा

खडकवासला धरण - ९५.५१ टक्के पाणीसाठा

पानशेत धरण - ९१.१६ टक्के पाणीसाठा

वरसगाव धरण - ८२.०५ टक्के पाणीसाठा

टेमघर धरण - ६३.४४ टक्के पाणीसाठा

Edited by - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kolhapur Politics: मधुरिमाराजेंच्या माघारीची INSIDE STORY; कोल्हापूर उत्तर मतदारसंघात काय घडलं?

Assembly Election: एकनाथ शिंदे आणि राज ठाकरेंमध्ये संघर्ष; शिंदेविरुद्ध दोन ठाकरे

Maharashtra Election: महायुतीनं केलंय काम भारी! लाडक्या बहिणींना मिळणार २१०० रुपये, कोल्हापुरात महायुतीची १० वचनं

Maharashtra News Live Updates: भाजपचा मनसेचे उमेदवार बाळा नांदगावकर यांना पाठिंबा

Uddhav Thackeray: पीएम मोदींच्या अशुभ हातांनी बांधलेला पुतळा पडला'; उद्धव ठाकरेंची टीका

SCROLL FOR NEXT