Pune Dam Water Level Today Saam TV
मुंबई/पुणे

Pune Dam Water Level: पुणेकरांचं पाण्याचं टेन्शन मिटलं, चारही धरणं काठोकाठ भरली; वाचा ताजी आकडेवारी

Pune Rain And Dam Water Level: पुणे शहर आणि जिल्ह्याला पाणी पुरवठा करणारे धरणं जवळपास १०० टक्के भरली. त्यामुळे पुणेकरांचे वर्षभराच्या पाण्याचे टेन्शन आता मिटले आहे.

Priya More

अक्षय बडवे, पुणे

पुणेकरांसाठी आनंदाची बातमी आहे. पुणे शहराला पाणीपुरवठा करणारी चारही धरणं काठोकाठ भरली आहेत. गेल्या काही दिवसांपासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे पुण्यातील धरणांच्या पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली. ४ धरणांपैकी ३ धरणं १०० टक्के भरली तर एक धरणं ९९ टक्के भरले आहे. पाणीपुरवठा करणारी धरणं पूर्ण क्षमतेने भरल्यामुळे पुणेकरांची वर्षभराच्या पाण्याची चिंता मिटली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पुणे शहर आणि जिल्ह्याला पाणी पुरवठा करणारे धरणं जवळपास १०० टक्के भरली. पुण्यातील चार पैकी ३ धरणांत १०० टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. वरसगाव, पानशेत आणि टेमघर धरणात १०० टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. खडकवासला धरणात ९० टक्के पाणीसाठा जमा झाला आहे.

जुलै आणि ऑगस्ट महिन्यामध्ये पुणे जिल्ह्याला पाणी पुरवठा करणाऱ्या धरण पाणलोट क्षेत्रामध्ये चांगला पाऊस झाला. धरण पाणलोट क्षेत्रात चांगला पाऊस झाल्यामुळे पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणात मुबलक पाणीसाठा जमा झाला आहे. पुणे जिल्ह्याला पाणी पुरवठा करणाऱ्या चारही धरणांमध्ये एकूण मिळून ९९ टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. पुणे शहराला दररोज या धरणांमधून पाणीसाठा केला जातो.

पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमधील पाणीसाठा -

खडकवासला: ९०.३९ टक्के

पानशेत: १०० टक्के

वरसगाव: १०० टक्के

टेमघर: १०० टक्के

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT