Pune Dam Water Level Today Saam TV
मुंबई/पुणे

Pune Dam Water Level: पुणेकरांनो, पाणी थोडं जपूनच वापरा; धरणांची पाणी पातळी अद्यापही चिंताजनक, पाणीसाठा किती?

Pune Dam Water Level Today: दरवर्षी जुलै महिन्यात धरणे पुणे शहराला पाणीपुरवठा करणारी धरणे ओव्हरफ्लो होत असतात. मात्र, यंदा तशी परिस्थिती अद्यापही दिसत नाही.

साम टिव्ही ब्युरो

अक्षय बडवे, साम टीव्ही

Pune Dam Water Level Today: गेल्या आठवडाभरापासून राज्यात पावसाचा जोर वाढला आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये सध्या मुसळधार पाऊस कोसळत आहे. पावसामुळे अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली असून धरणांमधील पाणीसाठ्यात वाढ होत आहे. अशातच पुणेकरांची चिंता अद्यापही कायम आहे. कारण, पुणे जिल्ह्यात आतापर्यंत समाधानकारक पाऊस झाला नाही.

त्यामुळे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये अद्यापही कमीच पाणीसाठी जमा झाला आहे. दरवर्षी जुलै महिन्यात धरणे पुणे शहराला पाणीपुरवठा करणारी धरणे ओव्हरफ्लो होत असतात. मात्र, यंदा तशी परिस्थिती अद्यापही दिसत नाही. पुणे जिल्ह्याला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये एकूण ६० टक्के पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे पुणेकरांना चांगल्या पावसाची प्रतीक्षा आहे.

खडकवासला धरण ७३ टक्के भरले असून मागील वर्षी आजच्या दिवशी ९५ टक्के इतका पाणीसाठा होता. याशिवाय पाशेत धरणात आतापर्यंत फक्त ६० टक्के पाणीसाठा जमा झालेला आहे. तर वरसगावात धरणात ५६.३३ टक्के पाणीसाठा जमा झालेला आहे.

दरम्यान, यंदा जून महिन्याच्या अखेरीस पिंपळगाव जोगे, मुळशी, टेमघर आणि नाझरे ही चार धरणे कोरडी पडली होती.शिवाय उजनीतील उपयुक्त पाणीसाठा शून्यावर आला होता. जिल्ह्यातील धरणांमध्ये उजनी, भामा आसखेड, माणिकडोह, चासकमान, पवना, मुळशी, टेमघर, वरसगाव, पानशेत, गुंजवणी, नीरा देवधर, भाटघर, वीर आदी प्रमुख धरणांचा समावेश आहे.

पुणे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या ४ प्रमुख धरणाची स्थिती

खडकवासला धरण: ७३ टक्के , १.४४ टीएमसी पाणीसाठा

पानशेत धरण: ६०.७४ टक्के, ६.४७ टीएमसी पाणीसाठी

वरसगाव धरण: ५६.३३ टक्के, ७.२२ टीएमसी पाणीसाठा

टेमघर धरण: ३९ टक्के, १.४४ टीएमसी पाणीसाठा

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT