Pune Cyber Crime Saam tv
मुंबई/पुणे

Pune Cyber Crime : विवाहविषयक संकेतस्थळावर झालेली ओळख पडली महागात; संगणक अभियंता तरुणीची ४० लाख रुपयांत फसवणूक

Pune News : पुण्यातील तरुणीने एका विवाहविषयक संकेतस्थळावर नाव नोंदणी केली होती. या संकेतस्थळावर तिची ओळख राजेश शर्मा या व्यक्तीशी झाली.

Rajesh Sonwane

अक्षय बडवे 
पुणे
:  संगणक अभियंता तरुणीने विवाहविषयक संकेतस्थळावर नोंदणी केल्यावर तिची ओळख एका तरुणाशी झाली. (Pune) दोघांची बोलणे होत असताना तरुणाने सदरच्या तरुणीला विवाह करण्याचा शब्द दिला. मात्र या तरुणाने नवीन व्यवसाय करण्याचे सांगीतले. तसेच परदेशी चालनाबाबत चौकशी होत असल्याचे (Cyber Crime) सांगून तरुणीकडे पैशांची मागणी करत तब्बल ४० लाख रुपयात फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. (Maharashtra News)

पुण्यातील तरुणीने एका विवाहविषयक संकेतस्थळावर नाव नोंदणी केली होती. या संकेतस्थळावर तिची ओळख राजेश शर्मा या व्यक्तीशी झाली. मी परदेशात एका मोठ्या कंपनीत अधिकारी आहे असं या शर्मा नावाच्या व्यक्तीने तिला बतावणी केली. शर्माने (Marriage) विवाहास होकार दिल्यानंतर त्या दोघांमध्ये संपर्क वाढला. यात त्याने लवकरच भारतात येऊन व्यवसाय सुरू करणार असल्याचे तरुणीला सांगितले. यासह त्याने एक बनावट विमान प्रवासाचे तिकिट देखील तिला पाठविले.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

दरम्यान दिल्ली विमानतळावर आलोय, पण परदेशी चलनाबाबत माझी चौकशी करण्यात येत असल्याचे त्याने या तरुणीला फोन करून सांगितलं. काही शुल्क या ठिकाणी असलेल्यांना द्यावा लागेल असे सांगून त्याने तरुणीला बँक खात्यात त्वरित पैसे जमा करण्यास सांगितले. त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेऊन या तरुणीने त्याच्या बँक खात्यात ४० लाख ५० हजार रुपये जमा केले. पैसे जमा केल्यानंतर शर्माने त्याचा मोबाइल बंद केला. तरुणीने संपर्क करण्याचा प्रयत्न केला परंतु होऊ शकला नाही. यामुळे आपली (Fraud) फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तिने पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Satara Fort : महाबळेश्वरला गेलात? 'या' किल्ल्यावरून दिसतं सह्याद्रीचं मनमोहक सौंदर्य!

Relationship Advice : जोडीदाराशी बोलताना ‘या’ ८ गोष्टी टाळा; नाही तर तुटू शकतं नातं

Maharashtra News Live Update: माजी महसूल राज्यमंत्री ॲड. मदन बाफना यांचे निधन

बाळाचे जावळ काढण्याचं योग्य वय काय? का केली जाते ही विधी?

राजकीय वारं फिरलं? भाजप उमेदवाराला मिळालं फक्त 1 मत; कुटुंबीयांनीही नाकारलं

SCROLL FOR NEXT