Pune Cyber Crime Saam tv
मुंबई/पुणे

Pune Cyber Crime: पुणेकरांनो सायबर चोरट्यांपासून सावधान! सायबर तज्ज्ञांनी सांगितले फसवणुकीचे नवे फंडे; अशी घ्या काळजी...

Pune Cyber Fraud Latest News: पार्ट टाईम जॉब किंवा कंपनीचे टास्क पूर्ण करा अशा भुलथापांना बळी न पडण्याचे आवाहन पुणे पोलिस तसेच सायबर तज्ञांनी केले आहे.

Gangappa Pujari

अक्षय बडवे, प्रतिनिधी...

Pune Online Fraud News : पुणे शहरात सायबर क्राईम गुन्ह्यांमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. धक्कादायक माहिती अशी की सायबर पोलिसात दररोज अशा किमान २ तक्रारी अर्ज दाखल होत आहेत. त्यामुळे पार्ट टाईम जॉब करा किंवा कंपनीचे टास्क पूर्ण करा आणि लाखो कमवा, अशा भुलथापांना बळी न पडण्याचे आवाहन पुणे पोलिस तसेच सायबर तज्ञांनी केले आहे.

गेल्या काही महिन्यांपासून (Pune) सायबर चोरट्यांनी सोशल मीडियावर आपले नेटवर्क चांगलेच पसरवले आहे. फेसबुक, व्हॉट्सऍप यानंतर आता टेलिग्रामकडेही त्यांनी मोर्चा वळवला आहे. टेलिग्रामच्या माध्यमातून ते दरवेळी भन्नाट आयडिया वापरून नागरिकांची लाखो रुपयांची फसवणूक करत आहेत. मागील पंधरा दिवसांपासून सायबर भामट्यांनी टेलिग्रामवर "वर्क फ्रॉम होम'चे आमिष दाखवत फसवणुकीचा नवा फंडा सुरू केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

काय आहे फसवणूकीची पद्धत...

नागरिकांना फसवण्यासाठी सायबर चोरटे वेगवेगळ्या शक्कल लढवत असल्याचे समोर आले आहे. ज्यामध्ये वर्क फ्रॉम होमचे आमिष दाखवणे, त्यातच आमिष दाखवत गुंतवणूक करण्यास भाग पाडून फसवणे आणि दुसरी पद्धत म्हणजे टेलिग्राम युजर्सना टास्क अपलोड करायला सांगायचे आणि पैसे पाठवण्यासाठी त्यांचे बँकेचे खाते क्रमांक मगववयचा आणि पैसे काढून घ्यायचे, अशी या चोरट्यांची पद्धत आहे. (Latest Marathi News)

तसेच कधी जेवणाची थाळी एका वर एक फ्री देऊन लुटणे, तर कधी टास्क भरून पैसे कमवा असा फंडा सायबर चोरट्यांनी तयार केला आहे. यामुळे पुणेकरांनो खाजगी माहिती आणि बँक खाते नंबर तुम्ही कुठल्या अनोळखी माणसाला तर देत नाही ना हे तपासून घ्या नाहीतर पैसे गेल्यावर डोक्याला हात लावून बसण्याशिवाय पर्याय राहणार नाही.

मागील १५ दिवसात दररोज किमान एक तक्रार पुण्यातील सायबर पोलिसांकडे येत आहे. त्यामुळेच कुठल्या ही लिंकवर क्लिक करून आपल्या बँक खात्याची माहिती देऊ नका तसेच पैश्याच्या आमिषाला बळी पडू नका, असे आवाहन पोलिसांकडून केले जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bad smell in car: कोणत्या कारणांमुळे कारमध्ये दुर्गंधी येऊ लागते?

Tiger Shroff Firing : टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणात नवं वळण! सलमान खानसह ४ बड्या अभिनेत्यांच्या घरांची रेकी, मुंबईतील 'या' व्यक्तीने केली मदत

Political News : राजकारणात खळबळ! मुख्यमंत्र्यांना ३ तास दिल्ली एअरपोर्टवर थांबवलं; ५० हजारांचा दंड घेतल्याचा आरोप

Marigold Plant : दिवाळीपर्यंत झेंडूच्या रोपाला येतील भरपूर फुलं; माळ्याची ही मोफत ट्रिक वापरा

Weak Heart Symptoms: ही १० लक्षणे सांगतील तुमचे हृदय कमजोर झाले आहे: चुकूनही करू नका दुर्लक्ष!

SCROLL FOR NEXT