पुण्यातील घोरपडे पेठेत पोलिस चौकीसमोर भरदिवसा तरुणावर अंधाधुंद गोळीबार
गोळीबारात नुरू शेख गंभीर जखमी, प्रकृती स्थिर
पूर्ववैमनस्यातून हल्ला केल्याचा प्राथमिक तपासात निष्कर्ष
पुणे पोलिसांनी तातडीने कारवाई करत अवघ्या २० मिनिटांत तीन आरोपींना अटक केली
पुण्यामध्ये दिसाढवळ्या गोळीबाराची घटना घडली. पोलिस चौकीसमोरच तरुणावर गोळ्या झाडण्यात आल्या. पुण्यातील घोरपडे पेठेत ही गोळीबाराची घटना घडली. या गोळीबारामध्ये तरुण गंभीर जखमी झाला. तरुणाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. पूर्व वैमनस्यातून ही गोळीबाराची घटना घडली. या प्रकरणाचा तपास करत पोलिसांनी अवघ्या २० मिनिटात आरोपींना बेड्या ठोकल्या. गोळीबाराच्या या घटनेमुळे पुणे हादरले.
मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील घोरपडे पेठेत आज दुपारी १२ वाजताच्या सुमारास ही गोळीबाराची घटना घडली. दुचाकीवरून आलेल्या आरोपींनी तरुणावर अंधाधुंद गोळ्या झाडल्या. या घटनेमध्ये नूरु शेख हा तरुण जखमी झाला आहे. सुजल सुनील परदेशी आणि त्याचे साथीदार यांनी घोरपडी पेठ येथे नूर शेख याच्यावर गोळीबार केला. या गोळीबारामध्ये तरुण गंभीर जखमी झाला.
जखमी ख्वाजा उद्दीन नाजीर शेख उर्फ नुरू शेख या तरुणाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तरुणाच्या पाठीत गोळ्या लागल्या असून त्याची प्रकृती स्थिर आहे. गोळीबाराच्या घटनेनंतर आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला. पोलिसांनी हल्लेखोर सुजल सुनील परदेशीला पळून जात असताना पाठलाग करत पकडलं. या गोळीबार प्रकरणी पोलिसांनी ३ तरुणांना अटक केली. पोलिस सध्या या प्रकरणाचा तपास करत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.