LPG cylinder saam tv
मुंबई/पुणे

Pune Crime : पुण्यातील धक्कादायक घटना, गॅस सिलिंडरच्या टाकीने ठेचून हत्या, कारण वाचून थक्क व्हाल

Pune murder case : पुण्यातील पिंपरी चिंचवडमधील मोशी परिसरात जेवण बनवण्याच्या कारणावरून झालेल्या वादातून एका कामगाराची गॅस सिलिंडरने ठेचून हत्या करण्यात आली. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.

Namdeo Kumbhar

Pune worker murdered with LPG cylinder after argument : पुण्यातील पिंपरी चिंचवडमध्ये एका व्यक्तीची गॅस सिलिंडरच्या टाकीने ठेचून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मोशी परिसरातील कुदळे वस्तीवर जेवण बनवण्याच्या कारणामुळे दोन कामगारांमध्ये जोरदार राडा झाला. त्यामधील एका व्यक्तीने रागाच्या भरात आपल्या सहकाऱ्याची सिलिंडरच्या टाकीने ठेचून निर्घृण हत्या केली. बालाजी खंदाडे (२९) असे मृत कामगाराचे नाव आहे. तर आरोपीचे नाव प्रदीप गुंडारे असे आहे. खंदाडे आणि गुंडारे हे नातेवाईक असल्याचेही पोलिसांच्या तपासात समोर आले आहे.

मोशीमधील कुदळे वस्ती येथील बांधकाम प्रकल्पावर खंदाडे आणि गंडुरे यांच्यमध्ये जेवण बनविण्याच्या कारणावरून जोरात वाद झाला. या वादात प्रदीप याने जवळच असलेल्या सिलिंडरच्या टाकीने बालाजी यांची हत्या केली अन् पसार झाला. पण पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करत तात्काळ तपास सुरू केला. पोलिसांनी मंगळवरी रात्री ३२ वर्षाच्या प्रदीप गुंडारे यांना बेड्या ठोकल्या आहे. आरोपी प्रदीप हा मूळचा लातूर जिल्ह्यातील असल्याचे पोलिसांच्या तपासातून समोर आले आहे.

पिंपरी चिंचवड येथील एमआयडीसी भोसरी पोलिसांनी या प्रकरणी तपास सुरू केला आहे. आरोपी प्रदीप गुंडारे याच्यावर भारतीय न्याय संहिता (बीएनएस) च्या कलम १०३ (खून) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास करणाऱ्या एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, गुंडारे आणि खंदाडे हे दूरचे नातेवाईक होते. ते बांधकामाच्या ठिकाणी काम करत होते. खंदाडे त्या ठिकाणी कामगार वसाहतीत राहत होते. सोमवारी रात्री ११.३० च्या सुमारास जेवण बनवण्यावरून दोघांमध्ये जोरात वाद झाला. गुंडारे यांनी सिलेंडर उचलला आणि खंदाडे यांच्यावर जोरदार हल्ला केला.

सिलिंडरच्या हल्ल्यात बालाजी गंभीर जखमी झाले होते. हल्ल्यानंतर प्रदीप यानं घटनास्थळावरून पळ काढला. पण बांधकामाच्या साईटवर असणाऱ्या काही कामगारांनी बालाजीला तात्काळ जवळच्या रूग्णालयात दाखल केले. पण अति प्रमाणात जखमा झाल्यामुळे उपचारावेळीच त्याचा मृत्यू झाला, अशी माहिती समोर आली आहे. पोलिसांनी आरोपी प्रदीप याला बेड्या ठोकल्या असून पुढील तपास करण्यात येत आहे. नेमक्या कारणाचा शोध पोलिसांकडून घेतला जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

51 कर्मचारी-अधिकाऱ्यांवर मोठी कारवाई! प्रशासकीय वर्तुळात खळबळ; महापालिकेत नेमकं काय घडलं?

गावरान स्टाईल कवळा भाजी बनवण्याची सोपी रेसिपी

Maharashtra News Live Update: ऑनलाईन तक्रारी वेळेत न सोडवल्याने सोलापूर महापालिकेची 51 अधिकारी-कर्मचाऱ्यांवर कारवाई

Thyroid symptoms: थायरॉईडची समस्या असेल तर अचानक पायांमध्ये दिसतील ही ६ लक्षणं

8th Pay Commission : आठव्या वेतन आयोगाबाबत महत्वाची अपडेट, पगारासोबत HRA, भत्ते आणि पेन्शनमध्येही होऊ शकतात मोठे बदल

SCROLL FOR NEXT