Pune Crime Saam Tv
मुंबई/पुणे

Pune Crime: पुणे हादरले! नवऱ्यासोबत कडाक्याचे भांडण, महिलेने ८ व्या मजल्यावरून मारली उडी

Women End Life In Pune: पुण्यातील तळेगाव एमआयडीसीजवळ एका महिलेने आत्महत्या केली. बिल्डिंगच्या आठव्या मजल्यावरून उडी मारून या महिलेने आयुष्य संपवलं. या घटनेमुळे पुण्यात खळबळ उडाली.

Priya More
  • पुण्यात नवऱ्यासोबत भांडणानंतर महिलेची आत्महत्या

  • महिलेने आठव्या मजल्यावरून उडी मारली

  • तळेगाव दाभाडे एमआयडीसी परिसरात घडली घटना

  • कौटुंबिक वादातून महिलेची आत्महत्या

पुण्यातील तळेगाव दाभाडे एमआयडीसी परिसरात एका महिलेने आत्महत्या केली. नवऱ्यासोबत घरगुती कारणावरून वाद झाल्यानंतर या महिलेने इमारतीच्या आठव्या मजल्यावरून उडी मारत आयुष्य संपवलं. या घटनेचा अंगावर काटा आणणारा व्हिडीओ देखील समोर आला आहे. प्रतिभा शकंर असं आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव होते. नवऱ्यासोबत वाद झाल्यानंतर रागाच्या भरात या महिलेने आत्महत्या केली. सध्या या घटनेचा तपास पोलिस करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, मावळच्या तळेगाव दाभाडे एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील कातवी गावात ही धक्कादायक घटना घडली. या ठिकाणच्या उच्चभ्रू सोसायटी असलेल्या अर्बन लाईफ टावरमध्ये ३२ वर्षीय प्रतिभा शकंर यांनी आत्महत्या केली. नवऱ्यासोबत झालेल्या भांडणानंतर या महिलेने आठव्या मजल्यावरून उडी मारून जीव दिला. दुसऱ्या बिल्डिंगमध्ये राहणाऱ्या व्यक्तींनी आपल्या मोबाइलमध्ये ही घटना कैद केली. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

प्रतिभा आणि तिचा नवरा यांच्यात घरगुती भांडण झाले होते. या रागाच्या भरात तिने आठव्या मजल्यावरून उडी टाकून आपले आयुष्य संपवलं. दरम्यान त्याच सोसायटीमध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीने आपल्या मोबाईलमध्ये हा व्हिडिओ कैद केला होता. त्याने मदतीसाठी आरडाओरडा केला पण उशिर झाला.

इमारतीच्या आठव्या मजल्यावरील फ्लॅटमध्ये रेलिंगला पकडून काही वेळ ही महिला काही वेळ थांबली होती आणि डोळ्याची पापणी लागली नाही तर तिचा हात सुटला आणि ती खाली जमिनीवर पडली. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या महिलेचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच तळेगाव एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तिचा मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. पोलिसया घटनेचा तपास करत आहेत. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकरांची मालेगाव सामान्य रुग्णालयाला अचानक भेट

Rahul Gandhi: राहुल गांधींच्या आंदोलनाला यश, पेलेट गनप्रकरणी अखेर गुन्हा, FIR मध्ये कुणाची नावं?

Vangyachi Chatni Recipe : गरमागरम भाकरी अन् वांग्याची झणझणीत चटणी, चव इतकी भन्नाट की विचारू नका!

Perfume Tips: महागडा परफ्यूम लावूनही काही वेळात सुगंध गायब होतोय? 'या' चुका टाळा, फ्रॅग्रन्स राहील दिवसभर!

Saturday Horoscope : मेहनीचं फळ मिळेल, ५ राशींचे भाग्य चमकणार; वाचा शनिवारचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT