Pune Crime Saamtv
मुंबई/पुणे

Pune Crime: संतापजनक! खडकवासला परिसरात हॉटेलची तोडफोड करत लुटले पैसे; कारवाईस आलेल्या पोलीस निरीक्षकालाही मारहाण

Pune Latest News: आरोपीवर सरकारी कामात अडथळा आणल्याचे तब्बल तीन गुन्हे दाखल असून इतरही अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत.

Gangappa Pujari

सचिन जाधव, प्रतिनिधी...

Khadakwasla Crime News: पुण्यातील सिंहगड रोड परिसरातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सिंहगड रस्त्यावरील खडकवासला गावच्या हद्दीत कोल्हेवाडी येथे सराईत गुन्हेगाराने हॉटेलची तोडफोड करून कामगारांना मारहाण करत पैसे लुटल्याची घटना समोर आली आहे. काल रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास घडलेल्या या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. (Crime News in Marathi)

याबाबत समोर आलेल्या माहितीनुसार, वैभव इक्कर (वय 22, रा. कोल्हेवाडी, खडकवासला) असे या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे. वैभव इक्कर व त्याचा एक साथीदार एका हॉटेलमध्ये गेले होते. यावेळी त्यांनी कर्मचाऱ्यांसोबत अगोदर हुज्जत घालून दारुच्या बाटल्या फोडल्या.

तसेच काही वेळानंतर त्यांंनी हॉटेलमधील कामगारांना मारहाण करत फ्रीज, काचेचे दरवाजे, दारुच्या बाटल्या यांसह इतर वस्तूंची तोडफोड करत सुमारे एक ते दिड लाखाचे नुकसान केले. यावेळी गुन्हगाराने गल्ल्यातील पंचवीस ते तीस हजार रुपये काढून घेतले.

पोलिस निरिक्षकालाही मारहाण..

धक्कादायक म्हणजे याबाबत माहिती मिळाल्यानंतर कारवाईसाठी आलेले हवेली पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक यांनाही गुन्हेगाराने मारहाण केली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

आरोपीवर सरकारी कामात अडथळा आणल्याचे तब्बल तीन गुन्हे दाखल असून इतरही अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. या प्रकरणी हवेली पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास करत आहेत. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi bhasha Vijay Live Updates : मनसैनिकांना पोलिसांनी घेतलं ताब्यात, दादरमधील वातावरण तापलं

ROAD ACCIDENT : लग्नाला निघालेल्या वऱ्हाडावर काळाचा घाला, नवरदेवासह ८ जणांचा मृत्यू, कार थेट कॉलेजच्या भिंतीत घुसली

Brushing Tips: ब्रश करण्याची योग्य वेळ कोणती?

Maharashtra Live News Update: कुकडी प्रकल्पातील डिंभे धरण ५० टक्के भरले

Street Style Pani Puri : ठेल्यावर मिळते तसे परफेक्ट पाणीपुरीचे पाणी, 'हा' एका पदार्थ रेसिपी बनवेल चटकदार

SCROLL FOR NEXT