Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्सप्रेस वे संदर्भात मोठी अपडेट; 'या' वेळेत वाहतूक बंद राहणार

Mumbai-Pune Expressway Traffic Updates: तुम्ही जर मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवरून प्रवास करणार असाल, तर तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे.
Mumbai-Pune Expressway Traffic Updates
Mumbai-Pune Expressway Traffic UpdatesSaam TV
Published On

Mumbai-Pune Expressway Traffic Updates: तुम्ही जर मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवरून प्रवास करणार असाल, तर तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे. मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवरील वाहतूक २ तासांसाठी बंद राहणार आहे. दुपारी १२ ते २ या वेळी महामार्ग बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या कालावधीत रस्त्यावरील दरड हटविण्यात येणार आहे.

Mumbai-Pune Expressway Traffic Updates
Pune Dam Water Level: पुणेकरांनो, पाणी थोडं जपूनच वापरा; धरणांची पाणी पातळी अद्यापही चिंताजनक, पाणीसाठा किती?

रविवारी रात्रीच्या सुमारास महामार्गावरील आडोशी बोगद्याजवळ दरड कोसळली होती. त्यामुळे मुंबईकडे जाणाऱ्या तिन्ही लेन बंद करण्यात आल्या होत्या. त्यानंतर पहाटे अडीचपर्यंत दरड हटविण्यात आली होती. त्यानंतर दोन लेन सुरू करण्यात आल्या होत्या. तर एक लेन अजुनही बंद आहे.

याच दरडी हटविण्यासाठी प्रशासनाने हा निर्णय घेतल्याची माहिती कळते आहे. दरम्यान, एक्सप्रेस वेवरील वाहतूक या दोन तासांसाठी वळवण्यात येणार आहे. पुण्याहून मुंबईकडे येताना चिवळे पॉइंट लागतो, तिथून जुन्या मुंबई पुणे महामार्गाकडे वाहतूक वळविण्यात येईल.

Mumbai-Pune Expressway Traffic Updates
Pune Crime News: पत्नी आणि पुतण्याची हत्या करत सहाय्यक पोलीस आयुक्ताने संपवलं जीवन; पुण्यातील खळबळजनक घटना

याच मार्गावरुन चार चाकी, हलकी मध्यम, अवजड स्वरुपाची वाहने जातील. १२ ते २ यादरम्यान ही वाहतूक जुन्या महामार्गाकडे वळविण्यात येईल. दरडी हटविण्याचं काम पूर्ण झाल्यानंतर मुंबईकडे जाणारी लेन पुन्हा सुरु करण्यात येईल, अशी माहिती एमएसआरडीसीने दिलेली आहे.

मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर दरडी कोसळण्याचा धोका वाढला

मागील काही दिवसांपासून एक्सप्रेस वेवर सातत्याने दरड कोसळण्याच्या घटना घडत आहे. त्यातच गेल्या दोन दिवसांपासून लोणावळा परिसरात मुसळधार पाऊस पडतो आहे. त्यामुळे दरडी कोसळण्याचा धोका आणखीच वाढला आहे. महामार्गावरून प्रवास करताना वाहनचालकांनी सतर्क राहावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com