माणुसकीला काळिमा फासणारी घटना; दारु प्यायला पैसे न दिल्याने आईचा खून
माणुसकीला काळिमा फासणारी घटना; दारु प्यायला पैसे न दिल्याने आईचा खून सागर आव्हाड
मुंबई/पुणे

माणुसकीला काळिमा फासणारी घटना; दारु प्यायला पैसे न दिल्याने आईचा खून

सागर आव्हाड साम टीव्ही पुणे

पुणे – एका मुलाने दारु पिण्याच्या व्यसनामुळे दसऱ्याच्या दिवशी आईला हातातील कड्याने, सुरी आणि लाकडी दांडक्याने मारहाण करत तिचा खून केला आहे. सिंहगड रोड पोलिसांनी आईचा खून करणाऱ्या या मुलाला अटक केली आहे. सचिन कुलथे असे या आरोपीचे आहे. तर, विमल कुलथे असे मृत महिलेचे नाव आहे.

हे देखील पहा -

याप्रकरणी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात अनिता चिंतामणी यांनी फिर्याद दिली आहे. दरम्यन, या घटनेबाबाद पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सचिनला दारु पिण्याचे व्यसन आहे. त्याच्या याच सवयीमुळे त्याची पत्नी त्याला एक वर्षापूर्वी सोडून गेली. सचिन गेल्या काही दिवसांपासून बेरोजगार होता. तो आईकडे नेहमी पैशाची मागणी करत असे.

दारुसाठी पैसे न दिल्याने दसऱ्याच्या दिवशी सचिनने आईला सुरीने व लाकडाच्या दांडक्याने मारहाण केल्याने तिचा मृत्यू झाला. त्यानंतर त्याने फिर्यादी बहिणीला याची माहिती दिली त्यानंतर ही घटना समोर आली. आईवर अंत्यसंस्कार केल्यानंतर अनिता चिंतामणी यांनी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात याप्रकरणी फिर्याद दिली. घटनेनंतर आरोपी फरार झाला होता. मात्र, पोलिसांनी त्याला स्वामी नारायण मंदिराजवळ असणाऱ्या टेकडी परिसरातील जंगलातून ताब्यात घेतले आहे. पुढील तपास सिंहगड रोड पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत कणसे करीत आहेत.

Edited By - Shivani Tichkule

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Rain News: विज पडल्याच्या आवाजाने घाबरुन ३ महिला पडल्या बेशुद्ध; एकीचा मृत्यू

Petrol Diesel Price : पेट्रोल-डिझेलचे नवे दर जाहीर; सामान्यांना मोठा दिलासा

Thane Crime News: धक्कादायक! मुंबईत धावत्या ट्रेनमध्ये मॉडेलवर अत्याचार; घटनेनंतर ३९ दिवसांनी गाठले पोलीस ठाणे

Gurucharn Singh Return Home : अखेर 'तारक मेहता...'फेम अभिनेता २५ दिवसांनी घरी परतला, गुरूचरण सिंह इतक्या दिवस कुठे होता?

Heat Wave Alert : दिल्लीकरांवर सूर्य कोपला, १४ वर्षांचा तापमानाचा रेकॉर्ड तुटला; ५ दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा

SCROLL FOR NEXT