Satish Wagh Murder Case Saam Tv
मुंबई/पुणे

Satish Wagh Murder Case: सतीश वाघ प्रकरणाला धक्कादायक वळण; अनैतिक संबंधात अडसर ठरल्याने पत्नीनेच केला घात

Satish Wagh Murder Case: भाजप आमदार योगेश टीळेकर यांच्या मामांचा घात त्यांच्याच पत्नीने केलाय. सतीश वाघ हत्या प्रकरणी पोलिसांनी पत्नी मोहनी वाघ यांना अटक केलीय. मोहनी वाघ यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आलीय.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

भरत मोहळकर, साम प्रतिनिधी

भाजपचे विधान परिषदेचे आमदार योगेश टिळेकर यांच्या मामा सतीश वाघ यांचं अपहरण आणि हत्येच्या प्रकरणाने पुणे शहर हादरलं होतं. मात्र पोलिसांनी तपासाची चक्रं फिरवली आणि मामाची हत्या मामीनेच केल्याचं उघड झालंय.. मात्र मामीने मामाचा काटा का काढला? नेमकं काय आहे या खुनामागचं रहस्य? जाणून घेऊयात या स्पेशल रिपोर्टमधून.

पती पत्नीच्या नात्याला काळीमा फासणारी धक्कादायक घटना पुण्यात घडलीय..विधानपरिषदेचे आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांच्या अपहरण आणि हत्येमागे पैशाचं नाही तर प्रेमप्रकरणाचं कारण समोर आलंय. सतीश वाघ यांची पत्नी मोहिनी वाघ हिचं आपल्या मुलाच्या मित्रासोबत गेल्या 12 वर्षांपासून अनैतिक संबंध असल्याचं उघ़ड झालं आणि यातूनच मामीने प्रियकरासोबत हत्येचा खतरनाक प्लान केला.

मामीनेच काढला मामाचा काटा

23 वर्षापुर्वी जवळकर दांपत्य मुलगा अक्षयला घेऊन पुण्यात आले

जवळकर दांपत्य हे वाघ यांच्या घरात भाडेकरू म्हणून राहत होते

36 वर्षीय मोहिनी वाघ यांचं मुलाच्या 20 वर्षीय मित्राशी सूत जुळलं

सतीश वाघ यांनी अक्षय आणि पत्नीला रंगेहात पकडलं आणि त्यांच्यात वाद निर्माण झाले

2016 मध्ये जवळकर कुटुंबाने घर खाली केल्यानंतरही अक्षय आणि मामीच्या भेटी सुरूच

सतीश वाघ पत्नीला मारहाण करायचे

अखेर वैतागून मामीने आणि अक्षयने मामाला संपवण्याचा कट रचला

अक्षय आणि मामीने 4 जणांना 5 लाखांची सुपारी दिली

त्यानंतर 9 डिसेंबरला अक्षयने वाघ यांचं अपहरण करत अखेर काटा काढला

सतीश वाघ यांची हत्या आर्थिक प्रकरणातून भासवण्याचा प्रयत्न करण्यात आला.. मात्र पोलिसांकडून घेतलेल्या जबाबात मामीने हत्येचा कट आपणच रचल्याची कबूली दिली. योगेश टिळेकर यांच्या मामाचं अपहरण आणि हत्येमुळे प्रकरणात पत्नी मोहिनी वाघ आणि अक्षय जवळकरसह 6 जणांना अटक केलीय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

आमदार सुनील शेळकेंच्या कुटुंबीयांवर जमिनीत उत्खननाचा आरोप, काकडेंकडून कारवाईची मागणी

Maharashtra Live News Update: पुणे महानगरपालिकेसाठी मनसेची उद्या मुंबईत महत्त्वाची बैठक

कोणत्या भाज्यांमध्ये टॉमेटोची प्युरी घालू नये, बेचव होईल भाजी

Sleeveless top fashion tips: तुमच्यासाठी कोणता टॉप परफेक्ट? स्लिव्हलेस की फुल स्लीव्ह्ज...ही एक सोपी ट्रिक करेल तुमची मदत

Mumbai : ठाकरे बंधूंचा महापालिकेत करेक्ट कार्यक्रम होणार, भाजपने सोडला टीकेचा बाण

SCROLL FOR NEXT