Pune Crime News x
मुंबई/पुणे

Pune : जुगाराच्या अड्ड्यावर पुणे पोलिसांचा छापा, रमी खेळताना भाजप पदाधिकाऱ्याला रंगेहात पकडलं

Pune Crime : पुण्यातील धनकवडी भागातील जुगार अड्ड्यावर पुणे पोलिसांनी छापा टाकला. तेव्हा भाजप पदाधिकारी रमी खेळत असल्याचे पोलिसांना आढळून आले. पोलिसांनी पदाधिकाऱ्यासह सातजणांवर गुन्हा दाखल केला आहे.

Akshay Badve
  • पुण्यात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा

  • रमी खेळताना भाजप पदाधिकाऱ्याला आढळला

  • पदाधिकाऱ्यासह ७ जणांवर गुन्हा दाखल

Pune Crime News : पुण्यातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पुण्याच्या धनकवडी भागामध्ये एका जुन्या पत्र्याच्या कारखान्यामध्ये जुगाराचा अड्डा सुरु होता. या अड्ड्यावर पुणे गुन्हे शाखेने छापा टाकला. छापेमारीमध्ये भाजपचा पदाधिकारी जुगार खेळताना आढळून आला. या पदाधिकाऱ्यासह सात जणांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्याच्या धनकवडी भागातील एका रिकाम्या पत्र्याच्या कारखान्यात काहीजण जुगार खेळत असल्याची माहिती पुणे गुन्हे शाखेला मिळाली. त्यांनतर सहकारनगर पोलीस आणि गुन्हे शाखेच्या युनिट २ च्या पथकाने या कारखान्यावर छापा टाकला. या ठिकाणी जुगार खेळणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाई केली.

धनकवाडी येथील छाप्यामध्ये पोलिसांना भारतीय जनता पक्षाच्या पर्वती विधानसभा मतदारसंघाचा चिटणीस रमी खेळताना आढळून आला. या भाजपच्या पदाधिकाऱ्याचे नाव औदुंबर विठ्ठल कांबळे असे आहे. छापेमारी दरम्यान औदुंबर कांबळे यांच्यासह सातजण जुगार खेळत असल्याचे दिसून आले. पोलिसांनी त्यांच्याकडून १० हजार २५० रुपये, जुगार साधने, मोबाईलसह एकूण २ लाख २० हजार ५५० रुपयांचा माल जप्त केला आहे.

अरुण गवळीचे नाव घेत व्यावसायिकाकडे मागितली खंडणी

'मी अरुण गवळीचा पीए बोलतोय, ५ कोटी पाठव', असे म्हणत एका ४९ वर्षीय व्यावसायिकाकडे बीडच्या काही तरुणांनी खंडणी मागितली. या प्रकरणी व्यावसायिकाने पोलिसात फिर्याद दिली. या खंडणी प्रकरणी गुन्हा दाखल केल्यानंतर पोलिसांनी तिघांना रंगेहात पकडले आहे. उरलेल्या दोघांचा शोध सुरु असल्याचे म्हटले जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

नागपुरमध्ये पुस्तकांचा महाकुंभ, मोबाईलला सुट्टी; 'सकाळ'च्या स्टॉलवर वाचकांची गर्दी|VIDEO

मोबाईलमधील गाणे बिबट्याला पळवतील दूर, अचानक आला समोर तर काय कराल? वनविभागाच्या महत्त्वाच्या सूचना

Salman Khan: सलमान भाईजानचा जलवा कायम; सिनेमा रिलीज होण्याआधीच केला 300 कोटीपेक्षा जास्त गल्ला

India Tourism : हिरवगार जंगल, धबधबे, व्हॅलीचे सौंदर्य; सर्वकाही एकाच ठिकाणी, 'हे' आहे स्वर्गाहून सुंदर ठिकाण

Birth Certificate: बोगस जन्म-मृत्यू दाखले रद्द होणार; फडणवीस सरकारचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT