पिंपरी-चिंचवडच्या मोरवाडीतील करिष्मा ग्लोरी सोसायटीमध्ये एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू
प्राथमिक तपासानुसार तिघांनी विषारी औषध घेऊन आत्महत्या केली
घटनास्थळी सुसाईड नोट सापडली
पिंपरी-चिंचवड शहरातील मोरवाडी परिसरात एक अत्यंत हृदयद्रावक घटना समोर आली आहे. आर्थिक विवंचनेतून एकाच कुटुंबातील तिघांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक बाब उघड झाली आहे. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.
मोरवाडी येथील करिष्मा ग्लोरी सोसायटीतील रूम क्रमांक २०१ मध्ये राहणारे विनोद पिल्ले (वय ५०), त्यांची पत्नी सिरजा पिल्ले (वय ४५) आणि मुलगी पौर्णिमा पिल्ले (वय १९) यांनी आत्महत्या केली आहे. एक ऑगस्ट रोजी विनोद पिल्ले यांचा मृतदेह त्यांच्या राहत्या घरी आढळून आला होता. त्याचवेळी पत्नी सिरजा आणि मुलगी पौर्णिमा या दोघी बेशुद्ध अवस्थेत सापडल्याने त्यांना तातडीने वायसीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान दोघींचाही मृत्यू झाला.
प्राथमिक तपासात तिघांनी विषारी औषध घेऊन आत्महत्या केली असावी, असा संशय संत तुकाराम नगर पोलिसांनी व्यक्त केला आहे. पोलिसांना घटनास्थळी विनोद पिल्ले यांनी लिहिलेली एक सुसाईड नोटही मिळाली असून, त्यामध्ये “आमच्या मृत्यूसाठी कुणालाही जबाबदार धरू नये,” असे नमूद करण्यात आले आहे.
माहितीनुसार, विनोद पिल्ले हे २०२४ पर्यंत एका नामांकित कंपनीत कार्यरत होते. त्यांची पत्नी सिरजा पिल्ले या मोरवाडीतील एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेत काम करत होत्या. तर मुलगी पौर्णिमा ही पिंपरी-चिंचवडमधील एका नामांकित महाविद्यालयात कॉम्प्युटर सायन्सचे शिक्षण घेत होती. या प्रकरणाचा पुढील तपास संत तुकाराम नगर पोलीस करत असून, आत्महत्येमागील नेमके कारण शोधण्याचे काम सुरू आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.