Pune Crime News Saam TV
मुंबई/पुणे

Pune Crime News : पिण्याचं पाणी मागितल्याने वाद; पुण्यात लोखंडी रॉडने वार करत तरुणाची हत्या

Pune Latest News : पिण्याचे पाणी मागितल्यावरून दोघांमध्ये वाद झाला. यामध्ये एका तरुणाची हत्या झाल्याची धक्कादायक घटना पुणे शहरात घडली.

Satish Daud

अक्षय बडवे, साम टीव्ही

पाणी पिण्यास मागितल्याने झालेल्या किरकोळ वादातून एका तरुणाची हत्या करण्यात आली. पुण्यातील मुंढवा परिसरातील कामगार मैदानाजवळ शनिवारी रात्रीच्या सुमारास ही घडली. श्रीकांत निवृत्ती आल्हाट असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली आहे.

राकेश तुकाराम गायकवाड असं अटक करण्यात आलेल्या व्यक्तींचं नाव असून याप्रकरणी संतोष आल्हाट यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत श्रीकांत हा आरोपी राकेशचा नातेवाईक होता. ते शेजारीच राहत होते.

श्रीकांत हा एकटा राहून मोलमजुरी करून उदरनिर्वाह करायचा. शनिवारी (८ मे )रात्री तो दारू पिऊन घरी आला. यावेळी त्याने राकेश याच्याकडे पिण्यासाठी पाणी मागितले. नशेत धुंद असल्यामुळे राकेशने त्याला पाणी देण्यास नकार दिला. यावरून दोघांमध्ये बाचाबाची झाली.

वाद इतका विकोपाला गेला, राकेश याने श्रीकांतच्या डोक्यात वीट, तसेच सिमेंटचा गट्टू मारला. गंभीर दुखापत झाल्याने श्रीकांतचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान, स्थानिकांकडून या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. श्रीकांतचा मृतदेह ताब्यात घेण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tamil Nadu Politics: राज्य सरकार तीन महिन्यात कोसळणार; माजी मुख्यमंत्र्यांच्या दाव्यानं राजकीय वर्तुळात खळबळ

Maharashtra News Live Update: अमरावती जिल्ह्यात अनेक भागात दमदार पावसाची हजेरी..

Kolhapur Fort : धुक्यात हरवलेला ऐतिहासिक किल्ला, कोल्हापूरमधील 'हे' ठिकाण इतिहासप्रेमींनी पाहायलाच पाहिजे

Jeans Pocket Facts : जीन्सला छोटा खिसा का असतो? ९९ टक्के लोकांना उत्तर माहीत नसेल

कॉकरोच जनता पार्टीची ताकद वाढणार; OBC चा बडा नेता प्रवेश करणार? राजकारण फिरणार?

SCROLL FOR NEXT