पुण्यातील आंबेगाव पठार येथे तरुणाची निर्घृण हत्या
कोयत्याने वार करून दगडाने ठेचून हत्या करण्यात आली
चार अल्पवयीन आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलं
किरकोळ वादातून ही घटना घडली
पुण्यामध्ये भररस्त्यात तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली. आधी कोयत्याने सपासप वार करण्यात आले. त्यानंतर दगडाने ठेचून तरुणाला जागीच संपवण्यात आले. पुण्यातील आंबेगाव पठार भागात ही घटना घडली. या घटनेमुळे पुण्यात खळबळ उडाली. या घटनेनंतर आंबेगाव पठार परिसरात तणावपूर्ण वातावरण आहे. घटनास्थळी पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. पोलिस सध्याया प्रकरणाचा तपास करत आहेत.
पोलिस उपायुक्त मिलिंद मोहिते यांनी सांगितले की, पुण्यातील आंबेगाव पठार भागात दगडाने ठेचून आणि कोयत्याने वार करत तरुणाची हत्या करण्यात आली. भारती विद्यापीठ पोलिस ठाण्याच्या हद्दीत सोमवारी रात्री ही घटना घडली. नयन जाधव असं हत्या करण्यात आलेल्या तरुणाचे नाव होते. किरकोळ वादातून ही घटना घडली. या तरुणावर चौघांनी कोयत्याने वार करत नंतर फेव्हर ब्लॉक डोक्यात घालून हत्या करण्यात आली.
या प्रकरणी पोलिसांनी चार आरोपींना अटक करण्यात आली असून चारही आरोपी अल्पवयीन आहेत. दोन आरोपी आंबेगाव पठार आणि दोन धनकवडी येथे राहणारे आहेत. आतापर्यंत झालेल्या तपासात चापट का मारली, शिवी का दिली? यावरून भांडण झाले होते. याच कारणातून नयन जाधव याची हत्या करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस अधिक तपास करत आहेत.
दरम्यान, पुणे जिल्ह्यातल्या भोर तालुक्यातील नसरापूर येथे एका ६५ वर्षीय व्यक्तीने ४ वर्षांच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करून हत्या केली होती. या घटनेमुळे पुणे जिल्हा हादरला आहे. आरोपीने वासरू दाखवतो सांगून चिमुकलीला गोठ्यात नेलं त्याठिकाणी त्याने तिच्यासोबत भयंतर कृत्य करून हत्या केली. आरोपीला फाशीच शिक्षा देण्यात यावी अशी मागणी करत राज्यभरातील नागरिक आक्रमक झाले आहेत. या प्रकरणी अनेक ठिकाणी आंदोलनं केली जात आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.