Crime Saam Tv
मुंबई/पुणे

पुण्यात भयंकर घडलं; सिंहगड कॉलेज परिसरात तरूणाची निर्घृण हत्या, कोयत्यानं सपंवलं

Youth Found Dead in Pune Sinhgad College Area: पुण्यातील सिंहगड कॉलेज परिसरातील एका इमारतीजवळ तरूणाची निर्घृण हत्या केली. कोयता अन् कुंड्यांनी वार करून तरूणाला संपवलं.

Bhagyashree Kamble

  • पुण्यात तरुणाचा खून

  • सिंहगड कॉलेज परिसरातील एका इमारतीजवळ हत्या

  • कोयत्याने आणि कुंड्याने मारहाण करून संपवलं

पुण्यातून एक भयंकर घटना उघडकीस आली आहे. पुण्यातील सिंहगड कॉलेज परिसरात एका तरूणाची हत्या करण्यात आली. कोयत्याने आणि कुंड्याने मारहाण करून तरूणाचा जीव घेतला आहे. मृत व्यक्तीचे वय २० ते २२ वर्ष असल्याची माहिती आहे. या प्रकरणी पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून, पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.

प्राथमिक माहितीनुसार, सय्यद असे मृत तरूणाचे नाव आहे. मृत तरूणाचे वय अंदाजे २० ते २२ असल्याची माहिती आहे. हा संपूर्ण प्रकार पुण्यातील सिंहगड कॉलेज परिसरातील इमारतीजवळ घडलेला आहे. आरोपीने कोयता आणि कुंड्याचा वापर करून तरूणाची निर्घृण हत्या केली आहे. तसेच तरूणाचा मृतदेह परिसरात टाकून पळ काढला आहे.

तरूणाचा मृतदेह पाहून परिसरातील नागरिकांना धक्का बसला. स्थानिकांनी तातडीने पोलिसांना याबाबत माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपासाला सुरूवात केली. तसेच मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी रूग्णालयात पाठवले. तरूणाची हत्या नेमकी कुणी केली? हत्या करण्यामागचं कारण काय? याचा तपास सध्या पोलिसांकडून सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fact Check: NEETचा पेपर पुन्हा फुटला? टेलिग्रामवरून NEETची प्रश्नपत्रिका व्हायरल?

बेस्टचा संप, रिक्षाचालकांकडून लूट, सामच्या स्टिंगमध्ये लुटीचा पर्दाफाश

उद्धव ठाकरेंना आणखी एक धक्का बसणार? ठाकरेसेनेचे 14 आमदार फूटणार; राजकारणात खळबळ

ओमराजे फुटले, 15 हजार फॉलोअर्स घटले, सोशल मीडियावर ओमराजेंविरोधात संताप

फुलांच्या वर्षावात, राजाभाऊ नाशकात, कोट्यवधींची ऑफर धुडकावणारे राजाभाऊ, ठाकरेंच्या निष्ठावानानं फोडलं ऑपरेशन टायगरचं बिंग

SCROLL FOR NEXT