Pune Crime News Saam Digital
मुंबई/पुणे

Pune Crime News: कुत्र्याला जीवे मारण्याची धमकी देत महिलेवर अत्याचार, घरात कोंडून ठेवून पाच दिवस केली अमानुष मारहाण

Pune Crime News: पाळीव कुत्र्याला जीव मारण्याची धमकी देऊन पुण्यात एका नराधमाने २८ वर्षीय महिलेवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पाच दिवस घरात कोंडून ठेवून तिला अमानुष मारहाण करून केली आणि पाच दिवस लैंगिक अत्याचार केले आहेत.

Sandeep Gawade

Pune Crime News

पाळीव कुत्र्याला जीव मारण्याची धमकी देऊन पुण्यात एका नराधमाने २८ वर्षीय महिलेवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पाच दिवस घरात कोंडून ठेवून तिला अमानुष मारहाण करून केली आणि पाच दिवस लैंगिक अत्याचार केले आहेत. संग्राम कोरेकर असे या नराधमाचे नाव असून कोंढवा पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोंढवा परिसरात राहणाऱ्या एका महिलेने कुत्रा पाळला आहे. पीडित महिला पाळीव प्राण्यांवर जीवापाड प्रेम करते. याचा फायता घेत आरोपी संग्राम कोरेकरने कुत्र्याला गॅलरीतून फेकून ठार मारण्याची धमकी देऊन तिच्यावर अत्याचार केले आहेत. पीडित महिलेच्या डोक्यात कठीण वस्तूने मारहाण केली. त्यानंतर जखमी अवस्थेत तिला स्वत:च्या घरात कोंडून ठेवलं. नराधमाने पीडित महिलेवर पाच दिवस अमानुष मारहाण करत अत्याचार केले आहेत. या प्रकरणी आरोपी विरोधात कोंढवा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास कोंढवा पोलीस करत आहेत.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार

दीड वर्षापासून अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार करणाऱ्या तरुणाला अटक करण्यात आली आहे. पीडित मुलगी तीन महिन्यांची गरोदर राहिल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी ओशिवरा पाेलीसांनी (oshiwara police) काश्मीर येथील अली बुखारी तारीक सय्यद उर्फ आकाश (वय १९) या संशयितास अटक केली आहे. 

ओशिवरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या एका अल्पवयीन मुली सोबत 19 वर्षीय काश्मिरी तरुणाची ओळख झाली. ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले व पुढे तरुणाने त्या अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून (ऑगस्ट 2022 ते 18/10/23) तिच्या सोबत अनेकदा शारीरिक संबंध प्रस्थापित केले. यामुळे अल्पवयीन मुलगी 3 महिन्याची गरोदर राहिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पंढरपुरातील विठ्ठल मूर्तीच्या चरणांची झीज; वज्रलेपासाठी परवानगी रखडली|VIDEO

एक कॅप्सूल, पाण्याचं पेट्रोल? पेट्रोलसाठी पंपावर जाण्याची गरज नाही?

Maharashtra Politics: माणिकराव कोकाटेंचं काय होणार? कोकाटे वादाच्या चक्रव्युहात?

Maharashtra Live News Update: वाशिम शहरातील गणेश पेठ येथे घराला अचानक आग

ईश्वरपुरात बलात्कारी राक्षस, सामुहिक अत्याचारानंतर नग्न धिंड

SCROLL FOR NEXT